File photo 
विदर्भ

गैरसमज विसरा! चंद्रपुरात "मस्जिद सबके लिए'

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : देशातील काही विशिष्ट कट्टरवादी संघटनांकडून मुस्लीम समाजाविषयी जाणीवपूर्वक द्वेष पसरविला जात आहे. विशषेत: मुस्लिम समाजाचे प्रार्थना स्थळ मस्जिद बाबत समाजात गैरसमज निर्माण केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अपप्रचार हाणून पाडण्यासाठी आता मुस्लिम समाजानेच पुढाकार घेतला असून मुस्लिमेत्तर धार्मिक, सामाजिक संघटना आणि प्रतिष्ठित नागरिकांना मस्जिदमध्ये आमंत्रित केल्या जाणार आहे. "मस्जिद सबके लिए' असे या उपक्रमाचे नाव आहे.
सामाजिक सद्‌भावनेसाठी या उपक्रमाचे आयोजन मुस्लिम शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना, (मेस्को) चंद्रपूरच्यावतीने करण्यात आले आहे. या संघटनेच्या वरोरा, बल्लारपूर आणि राजुरा येथे शाखा आहेत. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कट्टरवादी संघटनांमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. विशेषतः मुस्लिम समाजाचा बाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण केले जातात. त्यामुळे सामाजिक सदंभावनेला तडा जातो, असे अब्दुल रहेमान पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दोन धर्मातील तेढ वाढावे, यासाठी मुस्लिम समाजाचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिद बाबत पसरविल्या जातात. मात्र हे मुस्लिम समाजाचे पवित्र ठिकाण आहे. येथे मानवतेच्या कल्याणासाठीच काम केले जाते. भारतीय समाजात एक दुसऱ्यांच्या धार्मिक स्थळांना जाणून घ्यायची, त्यांचा आदर करायची परंपरा आहे. मुस्लिम समाजाला इतर धर्मांच्या सणाबाबत, उत्सवाबाबत माहिती असते. परंतु इतर धर्मीयांमध्ये मस्जिद आणि मुस्लिम धर्माविषयीचे ज्ञान फार कमी आहे. त्यामुळे गैरसमज निर्माण करणाऱ्यांचे फावते आणि ते अफवांना बळी पडतात. त्यामुळे मस्जिद मध्ये नेमके काय चालते. हाच गैरसमज दूर करण्यासाठी "मस्जिद सबके लिए' हा उपक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT