Most deaths of Amravati corona 
विदर्भ

विदर्भात 542 जण कोरोनाबाधित तर 26 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात कोरोनाच्या विषाणूचा प्रकोप सुरू आहे. पहिला कोरोनाबाधित रुग्ण 11 मार्च रोजी नागपुरात आढळला. यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून येऊ लागले. 11 मार्च ते 6 मे 2020 या दरम्यान तब्बल 542 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापैकी 36 जण दगावले आहेत. तर 117 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ते ठणठणीत बरे झाले आहेत. विदर्भात पाचशेचा पल्ला ओलांडल्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. 

नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद 11 मार्च रोजी झाली. यानंतर विदर्भातील यवतमाळ, अमरावती हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. विदर्भात 11 मार्च रोजी 50 रुग्णांची नोंद झाली. तर 14 एप्रिलला 100 तर 27 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या 200 वर पोहोचली. प्रारंभी कोरोनाच्या तपासणीचा वेग कमी होता यामुळे बाधितांची संख्या मर्यादित होती. अलीकडे तपासणीचा वेग वाढला. त्यानुसार, अवघ्या 10 दिवसांत कोरोना विषाणूबाधितांची संख्या 500 वर पोहोचली आहे. 

सध्या सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. नागपूर शहरात 262 रुग्णांची नोंद झाली आहे. यापाठोपाठ यवतमाळात 93 जण बाधित आढळले आहेत. अकोल्यात 88 तर अमरावतीमधील 70 तर बुलडाण्यात 24 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे. वाशीम जिल्ह्यात 2 तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे. अद्याप वर्धा आणि गडचिरोली दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. 

सर्वाधिक मृत्यू अमरावतीत

नागपूर शहरातील 262 रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मृत्यू अमरावती झाले आहेत. नागपुरात कोरोनाच्या बाधेने तीन तर अमरावती जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातही 10 जणांचे मृत्यू नोंदविले गेले आहेत. तर विदर्भात मृतांचा आकडा दोन जिल्ह्यात वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये एका आकड्यात आहेत. बाधित रुग्ण वाढत असतांनाच त्यांच्यावरील यशस्वी उपचारातून विदर्भात 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT