Crime esakal
विदर्भ

Crime News : कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहुन पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत २५ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि. बुलडाणा) - चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहुन पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत २५ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी सोमवारी (ता. १६) सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.

आरती मिलिंद इंगळे (२५, रा. आसनगाव ईस्ट जि. ठाणे ह.मु. रिधोरा जहांगीर ता. मोताळा) या विवाहितेने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, तिचा विवाह नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील मिलिंद सुपडा इंगळे याच्यासोबत झाला आहे. पीडिता ही पती सोबत आसनगाव ईस्ट जिल्हा ठाणे येथे वास्तव्यास होती. दरम्यान, पती मिलींद सुपडा इंगळे, सासू निर्मला सुपडा इंगळे (दोघे रा. टाकरखेड ह.मु. आसनगाव जि. ठाणे), सासरा सुपडा बुधाजी इंगळे, जेठ बारसु सुपडा इंगळे (दोघे रा. टाकरखेड ता. नांदुरा), प्रकाश श्रीपत सुरडकर, सिध्दार्थ श्रीपत सुरडकर (दोघे रा. रिधोरा जहांगीर ता. मोताळा) यांनी संगनमत करून चारचाकी कार घेण्यासाठी पीडित विवाहितेला माहेरवरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

पिडीत विवाहितेने माझ्या वडिलांकडे पैसे नाही असे सांगितले असता, आरोपी पती मिलिंद व सासू निर्मला इंगळे या दोघांनी तिला चापटांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तर, इतर आरोपींनी पीडितेचा पती व सासूला म्हटले की, तिला माहेरहुन पाच लाख रुपये आणायला सांगा. तिने पैसे नाही आणले तर तिला सोडून देऊ आणि मिलिंदचे दुसरे लग्न करून देऊ, असे म्हणून भडकावून देत असत. सोबतच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार २९ एप्रिल २०२१ ते २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत आसनगाव ईस्ट जि. ठाणे येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ अशोक आडोकार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT