file photo
file photo 
विदर्भ

आईनेच रचला मुलीचा बालविवाह

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : आईनेच आपल्या 15 वर्षीय मुलीचा बालविवाह अकोला जिल्ह्यातील युवकासोबत लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. पीडितेने शहर कोतवाली पोलिसांकडे धाव घेतल्याने ही घटना उजेडात आली. या प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
नितीन दुर्योधन उंबरकर (वय 29, रा. अवनी मिर्झापूर, जि. अकोला) याच्यासह अन्य दोन महिला अशा तिघांविरुद्ध मंगळवारी (ता. 26) रात्री गुन्हा दाखल झाला. महिलांमध्ये पीडित मुलीची आई आहे. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणामुळे पटत नसल्यामुळे पत्नी अकोला जिल्ह्यात एका गावात वास्तव्यास आहे. तर वडील अल्पवयीन मुलीसह अमरावती जिल्ह्यात राहतात. दरम्यानच्या काळात वडिलांसोबत राहणारी मुलगी व आईमध्ये बोलणे आणि काही वेळा भेटीगाठी होत होत्या. आईने मुलीला अवनी मिर्झापूर येथे बोलावून घेतले. त्या ठिकाणी नितीन उंबरकर या युवकासोबत तिचा बालविवाह लावला. त्याचवेळी एका सामाजिक संस्थेने आक्षेप घेतल्यामुळे बालविवाह थांबला. मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. आईने मुलीला काही दिवस आपल्याजवळ ठेवल्यानंतर नितीनसोबत नांदायला पाठविले. नितीनने एका खोलीत मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केला, असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले. त्यानंतर वडिलांनी मुलीची कशीबशी सुटका करून घेत तिला अमरावतीला आणले. शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील ओलावा या समुपदेशन केंद्रात तिचे समुपदेशन केले. कायदेतज्ज्ञांचे मत घेऊन ओलावा केंद्राने प्रकरण कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर नितीन उंबरकर, पीडितेची आई व नितीनच्या नात्यातील अन्य एक महिला अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT