mother of late child is still on her statement in Amravati  
विदर्भ

अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : बाळाची आई जुन्याच जबाबवर ठाम; हत्येचे रहस्य अद्याप कायम

संतोष ताकपिरे

अमरावती ः राजापेठ हद्दीत न्यू. प्रभात कॉलनीतील बाळाच्या हत्येप्रकरणी अटक आई आपल्या पूर्वीच्याच बयाणावर ठाम असल्यामुळे तपासातील तिढा कायम आहे.

आठ दिवसापूर्वी घराच्या आवारात ही घटना घडली होती. घटनेच्या वेळी घरात केवळ आई, सव्वा महिन्याचे बाळ आणि तिचा लहान भाऊ असे तिघे होते. तपासाच्या आधारे पोलिसांनी बाळाच्या आईला अटक करून तिची पोलिस कोठडी घेतली. रविवारी (ता. 6) घटनेच्या आठव्या दिवशी सुद्धा तपासाला आवश्‍यक ती दिशा मिळाली नव्हती. 

घटनेनंतर सहा ते सात दिवसाचा कालावधीत ती कुटुंबीयांच्या संपर्कात होती. तोच धागा धरून राजापेठ पोलिस तपास करीत आहेत. तीस सेकंदासाठी सदर महिला बाथरुममध्ये गेली. तेवढ्यात वेळात बेडरुममधील मुल बाहेर काढताना, त्याचा थोडाही आवाज कुणाच्याही कानावर कसा पडला नाही. समोरचे लोखंडी गेटही कुणीच उघडले नसताना कोण आत घुसले व मुलाला उचलून विहिरीत फेकले, हे कोड पोलिसांना अद्याप उलगडता आलेले नाही.

नक्की काय आहे प्रकरण 

२९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास न्यू. प्रभात कॉलनी येथील घरातून सव्वा महिन्याचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. घटना घडली तेव्हा घरात नम्रता आणि तिचा भाऊ असे दोघेच हजर होते. घटनेच्या दिवशी नम्रता तीस सेकंदासाठी बाथरुममध्ये गेली व परत आली असता, तिला बेडरुममधील बाळ बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. तिने भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली होती. मृतदेह आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी खुनाच्या गुन्ह्यांची नोंद घेतली होती.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : दिल्ली पोलिसांचे कारस्थानपूर्ण वर्तनही यातून उघड होते - पप्पू यादवांचे वकील

Omraje Nimbalkar यांना प्रमुखांचा मान, Ranajagjitsinha Patil डावलल्याची चर्चा, भाजपात खळबळ | Dharashiv

Abhishek Sharma: २५ षटकार, १५ चौकार अन् २३३ धावा... अभिषेक शर्माचं वादळी द्विशतक; पाहा Video

IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?

सप्तपदी, सात वचनं... पण अवघ्या १६८ तासांतच नात्याचा झाला शेवट; जोडप्यानं का घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

SCROLL FOR NEXT