Mother sent to judicial custody 
विदर्भ

अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईने हत्येचे कबुली दिली नाही; गूढ अद्यापही कायम

संतोष ताकपिरे

अमरावती : न्यू प्रभात कॉलनीतील दीड महिन्याच्या बाळाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आई नम्रता यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतरही नम्रताने मुलाच्या हत्येची कबुली दिलेली नाही. त्यामुळे बाळाच्या हत्येमागचे गूढ अद्यापही कायम आहे.

नम्रता यांचे दीड महिन्याचे बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार २९ नोव्हेंबर रोजी राजापेठ ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी घराच्या अंगणातील विहिरीतच बाळाचा मृतदेह आढळून आला होता. विहिरीवर लोखंडी जाळीचे आवरण असून एका बाजूने छोटेसे दार आहे. सदर दार बाजूला करून बाळाला अलगद विहिरीत टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

परंतु, सदर कृत्य करण्यामागे काय कारण दडले आहे, याचा उलगडा अद्यापही झाला नाही. दरम्यान, तपासात बाळाला काही आजार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे नम्रताने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. परंतु, तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत तिने ‘ना’चाच पाढा वाचल्याने अद्याप तरी या धक्कादायक घटनेमागील गूढ उकललेले नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT