mp navneet rana give reaction by standing at door of running bus in melghat of amravati  
विदर्भ

खासदार साहेबऽऽ हे बरं नव्हं; नवनीत राणा यांनी धावत्या एसटीच्या दारात उभे राहून दिली प्रतिक्रिया

राजीव तंतरपाडे

मेळघाट (जि. अमरावती): खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडू, असे सांगत धावत्या एसटीमधून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क नव्हता. तसेच धावत्या बसच्या दारात उभे राहून अशी प्रतिक्रिया देणे हे कितपत योग्य आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबईत अत्याधुनिक बसेस चालतात आणि मेळघाटात जुन्या भंगार बसेस चालविल्या जातात. हा आदिवासींच्या जिवाशी चालणारा खेळ त्वरित थांबवून किमान सुखरूप प्रवास होईल, अशी व्यवस्था राज्य शासनाने करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केली.

राणा दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्यामुळे आधी त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना  मुंबईला हलवण्यात आले होते. मुंबईत उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोना झाल्यानंतर कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते याची जाणीव असूनही नवनीत राणा यांनी विना मास्क धावत्या एसटीच्या दारात उभे राहून प्रवास केला. त्यामुळे त्यांचा हा प्रवास वादात सापडला आहे. 

दरम्यान, नवनीत राणा व रवी राणा यांनी अचलपूर येथील फिनले मिल कामगारांच्या उपोषणास भेट दिली. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. कुठल्याच परिस्थितीत फिनले मिल बंद पडू देणार नाही, असेसुद्धा ते म्हणाले. 

नवनीत राणा व रवी राणा गेल्या पाच दिवसांपासून  अचलपूर-मेळघाट विधानसभा संपर्क दौऱ्यावर आहेत. अचलपूर-परतवाडा परिसरातील कामगारांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असणारी ङ्किनले मिल कोरोना लॉकडाउनमुळे बंद पडलेली आहे. कामगारांना पूर्ण वेतन मिळत नाही त्यांची व कुटुंबीयांची उपासमार होत आहे. कामगारांना भेटून त्यांची आस्थेने विचारपूस केली व तेथूनच तत्काळ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याशी संपर्क साधून कामगारांना न्याय देण्याचे सुचविले. दरम्यान, लवकरच यावर तोडगा काढू, असे वचन स्मृती इराणी यांनी खासदार नवनीत राणा यांना दिले. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT