tax collection Record Lonar Municipality
tax collection Record Lonar Municipality sakal
विदर्भ

लोणार नगरपालिकेची विक्रमी करवसुली

सकाळ वृत्तसेवा

लोणार : नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांचे मार्गदर्शन व कर निरीक्षक अन्वर शहा यांचे नियोजनामुळे लोणार नगरपरिषदेने यंदाही विक्रमी कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे कधी २७ टक्केवर राहणारी कर वसुली मागील तीन वर्षापासून सलग चढता आलेख घेत आहे. यंदा करवसुली ८३ टक्केवर नेण्याचे काम मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी व त्यांच्या टीमने केले आहे.

विशेष म्हणजे या वर्षी कोणतेही थकबाकीदारांचे फलक न लावता ही वसुली करण्यात आली आहे. मुख्याधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे कर निरीक्षक अन्वर शहा यांनी दोन पथके तयार केली. त्यानुसार पथक क्रमांक एक मध्ये करनिरीक्षक अन्वर शहा यांच्यासोबत संगणक अभियंता सुजित चव्हाण, अशोक शर्मा, संतोष जाधव, एस. एस. एंनेवार, सुशील शेटे व भगवान मोरे

तसेच पथक क्रमांक दोनमध्ये लेखापाल व्ही. एस. पहुरकर यांच्यासोबत रचना सहाय्यक सुशील थोरात, कैलास नेवरे, अशोक निचंग, किरण गडकर, काळबांडे, तुकाराम जाधव, खंदारे, मधुकर घाटोळे, एस. पी. सूर्यवंशी, पी. यू. सानप व कर विभागाचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे नगरपरिषद सदस्यांनी कर्मचार्‍यांना आपापल्या वॉर्डामध्ये वसुलीसाठी मोलाचे सहकार्य केले. त्यासाठी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी नगराध्यक्ष पुनमताई पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा खान तसेच शिवसेना गटनेते तथा जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी व काँग्रेसचे गटनेते भूषण मापारी यांचे आभार व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT