Teacher
Teacher 
विदर्भ

५७ टक्के विद्यार्थ्यांना वाचताही येईना

सकाळवृत्तसेवा

नागपूर - महापालिकेच्या शाळांतील केवळ ४३ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचता येत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. अद्याप ५७ टक्के विद्यार्थी वाचनात मागे असून, मनपा शाळांतील शिक्षकांच्याच कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

महानगरपालिकेच्या समग्र शिक्षा विभागाच्या वतीने शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत मनपा शाळांमधील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी अध्ययन स्तर निश्‍चिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सर्वेक्षणाचा हवाला देत महापालिकेच्या शाळेतील विदारक चित्र स्पष्ट केले. या वेळी मंचावर मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, तहसीलदार श्री. वाघमारे, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, डीआयसीपीटीचे प्राचार्य रवींद्र रमतकर उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांची स्थिती बघता येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करून वाचनक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किमान ८६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. ‘असर’द्वारे मनपाच्या शाळांसह नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमधील शाळांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सर्व्हे करण्यात आले. याअंतर्गत ‘असर’चे टूल वापरून विविध स्तरांवर विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली.

 या सर्वेक्षण व चाचणीतून महापालिकेच्या केवळ ४३ टक्‍केच विद्यार्थ्यांनाच वाचता येत असल्याचे पुढे आले. पारशिवनी तालुक्‍यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या ४९ टक्के मुलांनाच वाचता येत असल्याचे लक्षात आले. यानंतर येथील शिक्षक व मुख्याध्यापकांनी वेळोवेळी चर्चा करून, अध्ययन व अध्यापन प्रणालीत विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी कार्य केले. त्याचे फळ म्हणून अवघ्या तीन महिन्यांतच येथील ७३ टक्के मुलांना वाचता येत असल्याचे पुढील सर्व्हेमध्ये दिसून आले. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवीत येत्या शैक्षणिक सत्रात मनपा शाळांमध्ये वेगळे परिवर्तन दिसून येईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. यासाठी मनपाच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी एकजुटीने काम करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावून मनपा शाळा १०० टक्के प्रगत करण्यासाठी कार्य करण्यात येईल, असेही सांगितले. संचालन क्रीडाधिकारी नरेश सवाईतूल यांनी केले. आभार सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT