municipal solid waste scam Vishal Srivastava in police custody sakal
विदर्भ

घनकचरा घोटाळ्यातील फरार आरोपी विशाल श्रीवास्तव पोलिसांच्या ताब्यात

पालिकेतील घनकचरा घोटाळ्यातील फरार सहा जणांपैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड : नगर परिषदेच्या घनकचरा घोटाळा प्रकरणातील तत्कालीन आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव यांना शुक्रवारी (ता.११) दुपारी साडेबारा बाजता स्थानिक पोलिसांनी त्यांच्या आठवडी बाजार येथील घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणातील फरार सहा जणांपैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

घनकचरा प्रकरणात नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदारांसह अकरा जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर सहा आरोपी फरार तर नगराध्यक्षांसह पाच जणांना न्यायालयाने अंतरीम जामीन दिला आहे. या प्रकरणात सात फेब्रुवारी रोजी गुन्हे दाखल झाल्यानंतर एक महिना लोटुनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. यावर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली असताना अखेर आज दुपारी विशाल श्रीवास्तव यांना त्यांच्या घरासमोरून उमरखेड पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असल्याने पोलिस त्यांच्या हवाली करणार आहेत.

नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम ५८ (२) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढण्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून आमदार नामदेव ससानेंसह अकरा जणांवर नगर विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांनंतरच तपास आर्थिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडे देण्यात आला. तपास अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी (ता.११) आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्या हवाली करणार आहेत. वृत्त लिहिपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी उमरखेडला दाखल झाले नव्हते. त्यामुळे अटक करण्यात आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Was Dr. Manisha Jejurkar? नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य, डॉक्टर नवरा घरात नसताना...

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

SCROLL FOR NEXT