crime 
विदर्भ

सहा वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातुन खून

संतोष ताकपिरे

अमरावती : सहा वर्षांपासून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामावरुन झालेला वाद वाढल्यामुळे वलगाव येथील भीमनगरात मंगळवारी (ता. दोन) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास खून झाला. गोवर्धन काशिनाथ कटकतलवारे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणात नितीन रामदास कटकतलवारे (वय ३७, रा. भीमनगर, वलगाव) यास पोलिसांनी अटक केली. नितीनसह पोलिसांनी राहुल सुरेश तायडे (वय ३२), संदीप प्रभाकर सोनवणे (वय २८), सागर विजय तायडे (वय २८), मंगेश अरुण वाडेकर (वय ३३), अरविंद सूर्यभान पळसपगार (वय ४७), छोटू आदित्य रवी तलवारे (वय २०), राहुल दुर्योधन जाटे (वय ३७, सर्व, रा. भिमनगर, वलगाव) अशा आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मृत गोवर्धन यांच्या पत्नी प्रतिभा कटकतलवारे (वय ३७) यांनी वलगाव ठाण्यात तक्रार केली.

सहा वर्षांपासून काँक्रिट रस्ता बांधकामाचा वाद व गोवर्धन यांच्या पत्नीची छेडखानी केल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. मंगळवारी (ता. एक) दुपारी चारच्या सुमारास प्रतिभा व नितीन यांची आई या दोघींमध्ये पुन्हा क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक होऊन वाद झाला. त्या प्रकरणात दोन्ही गटाने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरण चौकशीमध्ये ठेवले. रात्री गावात गेल्यानंतर, गोवर्धन यांच्या दुचाकीवरून प्रतिभा व त्यांची सासू खाली उतरून विजय शेंडे यांच्या घरासमोर आल्या. त्याचवेळी काहींनी चिथावणीखोर वक्तव्य करून गोवर्धन यांना गाठले. नितीनने त्यांच्यावर चाकूने प्रहार केला. काहींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने वार केले. गंभीर जखमी गोवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला. खून झाल्याचे कळताच नितीन वगळता उर्वरित सातही साथीदार पसार झाले. नितीनला तासाभरात वलगाव पोलिसांनी अटक केली.

फरार हल्लेखोरांचा शोध सुरू
ब-याच दिवसांपासून सुरू असलेला वाद तक्रारीनंतरही संपत नव्हता, खुनानंतर वेळीच दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. उर्वरित फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक वलगाव ठाणे

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

संजय लीला भन्साळींसोबत रिलेशनशिप तरीही अविवाहित आहेत गीता कपूर; का नाही केलं लग्न? सांगितलं खरं कारण

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT