crime 
विदर्भ

इथे रक्ताची नातीही दोरीने आवळली जातात तेव्हा... वाचा संपूर्ण कथा

चेतन देशमुख

यवतमाळ : क्षुल्लक कारणही कधीकधी मोठ्या वादाला कारणीभूत ठरते. आणि असे वाद जीवावरही उठतात. पावसाळा सुरू झाला की घर गळू नये म्हणून घराची ग्रामीण भागात घराची डागडुजी सुरू होते. अशाच एका घरी टिनपत्रे टाकण्याचे काम सुरू होते आणि तेच दोन भावांमधील भांडणचे कारण ठरले आणि त्यातील एका भावाला या भांडणात जीव गमवावा लागला. घरावर टिनपत्रे टाकण्याच्या वादात मोठ्या भावाचा लहान भावाने नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना शिवणी येथे रविवारी (ता.नऊ) दुपारी अडीच वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

कुणाल दीपक नागोसे (वय 23, रा. शिवणी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी सतीश दीपक नागोसे (वय 22, रा. शिवणी) याला ताब्यात घेतले. रविवारी दुपारी कुणाल घरावर टिनपत्रे टाकत असताना त्याचा भावासोबत वाद झाला. दोघांमध्ये झटापट झाली.

रागाच्या भरात कुणालला खाली पाडून सतीश त्याच्या छातीवर बसला. आणि नायलॉन दोरीने गळा आवळून मोठ्या भावाला जिवानिशी मारले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

सविस्तर वाचा - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी वृंदा गजानन राऊत (वय 35, रा. शिवणी) या महिलेने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सतीश नागोसे याच्याविरुद्घ गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT