चंद्रशेखर निपाने 
विदर्भ

जुना वाद उफाळून आला अन्‌ "त्या' सराईत गुन्हेगाराचा खात्मा झाला...

सकाळ वृत्तसेवा

मोहाडी (जि. भंडारा) : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र अशाही वातावरणात जुने वाद विकोपाला जाऊन खून, हाणामारीसारखे प्रकरणे घडत आहेत. मोडाडीत जुन्या वादातून एका गुंडाचा डोक्‍यावर दगड व चाकूचे वार करून खून करण्यात आला.

ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता. 16) रात्रीच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील सिमेंट रस्त्यावर घडली. चंद्रशेखर ऊर्फ रवरान निपाने (वय 42) असे मृत गुंडाचे नाव आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी पाच जणांना रात्रीच ताब्यात घेतले आहे.

सराईत गुन्हेगाराला चोप

मोहाडी येथील चंद्रशेखर निपाने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर खंडणी वसुली, नागरिकांना धमकावणे, गांजा तस्करी, चोरी यासारखे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते; तर मोहाडी ठाण्यात त्याच्या नावावर चार गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार म्हणून त्याच्यावर भंडारा, तुमसर पोलिस ठाण्यांतही विविध घटनांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. तुमसर, देव्हाडी येथील गुन्हेगारांशी त्याची जवळीक होती. चार दिवसांपूर्वीच तो गांजा ओढताना सापडल्याने पोलिसांनी त्याला चांगलाच चोप दिला होता.

पाच आरोपींना अटक

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील संशयित आरोपी व चंद्रशेखर यांच्यात जुना वाद उफाळून आला होता. याच वादातून गुरुवारी रात्री चंद्रशेखर याचा दगडाने ठेचून तसेच घाव घालून गेम करण्यात आला. पोलिसांनी उमेश झडू मारबते (वय 25), दिनेश झडू मारबते (वय 27), नितीन नरेश मारबते (वय 26), आनंद मनोहर हेडाऊ (वय 20), राहुल मनोहर हेडाऊ (वय 19, रा. सर्व मोहाडी) या पाच जणांना गुरुवारी (ता. 16) रात्रीच अटक केली.

इतर आरोपी रुग्णालयात दाखल

त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील अरोपी आनंद व राहुल हे सध्या मोहाडी ठाण्यात अटकेत आहेत. तर इतर आरोपींनी आजाराचे कारण सांगितल्याने पोलिसांनी उमेश, दिनेश, नितीन यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT