Murder Murder
विदर्भ

थुंकणाऱ्यास हटकल्यामुळे वृद्धाचा खून

सकाळ वृत्तसेवा

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : सकाळी दात घासत असणारी व्यक्ती नालीत थुंकल्यामुळे वृद्धाने हटकले. त्यावरून रागाच्या भरात जवळची काठी हिसकून वृद्धावर प्रहार करून खून केला. तुळशीराम दौलत गाडे (वय ७२, रा. निमखेडबाजार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनगावसुर्जी तालुक्यातील निमखेड गावात मंगळवारी (ता. पाच) सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तुळशीराम गाडे हे पहाटे काठी घेऊन फिरण्यासाठी निघाले असता त्यांच्या घरासमोर संशयित संगम सुनील दामले (वय २५) हा दात घासून नालीमध्येच थुंकताना दिसला.

गाडे यांनी संगम यास हटकले. त्यावरून त्यांच्यामध्ये तू-तू, मै-मै झाली. शिवीगाळ करून संगमने गाडे यांच्यासोबत भांडण केले. हातातील काठी हिसकून जबर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी तुळशीराम गाडे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गाडे यांचा मृत्यू झाला.

आरोपीला अटक

संशयित संगम सुनील दामले याने काठीने प्रहार करून सासऱ्यांची हत्या केली, असा आरोप मंदा संतोष गाडे (वय ४०) यांनी अंजनगावसुर्जी ठाण्यात दाखल तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी संगम दामलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT