विदर्भ

अमरावतीत दोघांचा खून; मध्यरात्री विळ्याने कापला गळा

संतोष ताकपिरे

अमरावती : चांदूररेल्वे तालुक्याच्या कळमगाव येथे शेतमजुराचा विळ्याने गळा कापून खून (Murder in Amravati) करण्यात आला. विकास प्रल्हाद गवई (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे ठाणेदार मगन मेहते यांनी सांगितले. (Murder-of-two-persons-in-Amravati-district)

विकास गवई हे शेतमजुरीचे काम करायचे. बुधवारी रात्री कळमगाव येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. येथील विहाराजवळ गवई यांच्या गळ्यावर कुणीतरी विळ्याने वार केला. त्यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती चांदूररेल्वे पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

गवई यांची पत्नी सविता विकास गवई (वय ३६, रा. कळमगाव) यांनी चांदूररेल्वे पोलिसांत तक्रार नोंदविली. त्याआधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला. विकास गवई यांची हत्या कशासाठी व कुणी केली, हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या दिवशी विकास गवई यांच्यासोबत कोण होते, याबाबत माहिती घेण्याचे व चौकशीचे काम सुरू आहे. लवकरच खुनाचा उलगडा होईल.
- मगन मेहते, ठाणेदार, चांदूररेल्वे

डिवचल्यामुळे केला खून

भारत जानराव दुर्योधन (वय ४२, रा. कळमगाव) याने २०१३ मध्ये खून केला होता. त्यात त्याला २०१७ मध्ये शिक्षा झाल्याने कारागृहात होता. कोविडच्या प्रादुर्भावामुळे त्याला संचित रजेवर सोडले. बुधवारी रात्री विकास गवई व भारत दुर्योधन हे दोघे समोरासमोर आले. विकासने भारतला जुन्या खुनाच्या कारणावरून डिवचले. त्यामुळे त्याने रागाच्या भरात विकासवर विळ्याने वार करून खून केला, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT