Murderer Attack sakal
विदर्भ

Wardha Crime : मित्राच्या पार्टीत मैत्रीण दिसताच संताप अनावर; मित्रावर केला हल्ला

मित्राच्या बर्थ डे पार्टीत मैत्रीण आल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी एकावर चाकूने हल्ला चढविला होता.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा - मित्राच्या बर्थ डे पार्टीत मैत्रीण आल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी एकावर चाकूने हल्ला चढविला होता. त्या घटनेपासून या प्रकरणातील आरोपी फरार होते. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपींना अँटी गॅंग सेलच्या पथकाने पुणे येथील वाकड परिसरातून अटक केली. यश ऊर्फ प्रसाद पराते, (वय २३), रा. अग्निहोत्री कॉलेजजवळ, रामनगर, कुश गजानन तिरपुडे (वय २३), रा. हिंदनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. त्यांना दिलेल्या पार्टीत यश पराते आणि त्याचा मित्र कुश तिरपुडे हा आला होता. या पार्टीत यशची मैत्रीण दिसल्याने त्यांने मंडळी जमवून सदर ठिकाणी तक्रारदारास शिवीगाळ करून काचेच्या बाटलीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. मुख्य आरोपी यश पराते याने चाकूने हल्ला केला. या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी यश पराते व त्याचा साथीदार अंकुश तिरपुडे वर्धेतील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर रामनगर, वर्धा शहर, सावंगी येथे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. ते घटना तारखेपासून पसार होते. त्यांचा शोध सुरू असताना दोन्ही आरोपी पुणे जिल्ह्यात राहत असल्याबाबत माहिती अँटी गॅंग सेलला मिळाली.

त्यानुसार सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा सुगावा नसताना तांत्रिक पद्धतीने आरोपीतांचा शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे पुणे येथे असल्याचे पुढे आले. येथे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना ताब्यात घेऊन वर्धा येथे आणून पसार असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हवालदार गजानन लामसे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे यांनी केली.

दोघांवरही अनेक गुन्हे

अटक करण्यात आलेल्या दोघांवर शहरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यश पराते हा विविध गुन्ह्यात पसार आहे. तसेच अंकुश गजानन तिरपुडे हा एक वर्षाकरिता स्थानबध्दतेवरून सुटून आल्यानंतर लगेच दहा दिवसानंतर पो.स्टे. सावंगी मेघे येथे गुन्हा करून पसार झाला.

१२५ ठिकाणी केली तपासणी

आरोपी पुणे येथे असल्याचे कळताच पोलिसांनी पुणे गाठत पिंपरी चिंचवड, रावेत, हिंजवडी, वाकड परिसरात असल्याची माहिती मिळाली. अँटी गॅंग सेल स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सतत सहा दिवस सदर ठिकाणी सापळा रचून एटीएम मशिन, हॉटेल, लॉजेस, पान टपरी, हॉटेल पब असे अंदाजे शंभर ते १२५ ठिकाणी तपासणी केली. त्यात यश पराते, अंकुश तिरपुडे हे वाकड परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना सापडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT