murderer attack
murderer attack sakal
विदर्भ

मैत्रिणीसह बँक कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला; दोघेही गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

मंथएंडची पार्टी करून आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह घराकडे परत येताच संशयिताने मैत्रिणीसह कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

अमरावती - मंथएंडची पार्टी करून आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह घराकडे परत येताच संशयिताने मैत्रिणीसह कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास शहरातील देवरणकर नगर परिसरात घडली.

एक युवतीसह अन्य एक असे दोघे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. या हल्ल्यातीला गंभीर जखमी युवती ही शहरातील एका खाजगी बँकेत नोकरी करते. बँकेत काम करणाऱ्या तिच्या इतर साथीदारांनी मंथ एंडची पार्टी ठेवली होती. पार्टी आटोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर साडेबाराचे सुमारास, युवती, देवरणकरनगर परिसरात कारमधून खाली उतरली. त्याचवेळी तिचा बॉयफ्रेंड राहुल खडसे याने तीला गाठले. ही सगळी मंडळी कोण आहेत? तुझ्यासोबत काय करतेस? या शब्दात विचारणा करून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.

सर्वांच्या समक्ष बँकेचे सहकारी जितेंद्र भादे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आपल्या आधिनस्थ कर्मचाऱ्यांवर हल्ला होत असल्याचे बघून, त्या दोघांमधील भांडण सोडविण्यासाठी पीडित युवती ही मध्यस्थी करण्यासाठी गेली. त्याचवेळी तिलाही जुमानले नाही. तिच्याही मांडीत संशयित राहूलने चाकूने वार करून तिचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला.

तू प्रेमात धोका दिला. या शब्दात तिला संशयित राहुल खडसे याने सुनावले. एकाच वेळी मैत्रिणीसह बँकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने, मध्यरात्रीच्या सुमारास चांगलीच खळबळ उडाली होती. जखमी युवतीची मैञीण हिने राजापेठ पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी संशयित राहुल खडसे विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. असे मनीष ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT