विदर्भ

Shivpuran Katha : शिवपुराण कथेसाठी मुस्लिमाची जमीन

हाजी शोएब यांनी फिरवला ४६ एकरवर नांगर; धार्मिक ऐक्याचे अनोखे दर्शन

गणेश पांडे

परभणी : धार्मिक सहिष्णुता आणि बंधुभावामुळे विविधतेत एकता हे भारताचे सांस्कृतिक सूत्र उठून दिसते. विविध जाती धर्मांच्या लोकांतील सलोखा हाच आपल्या देशाच्या ऐक्याचा पाया आहे. परभणीमध्ये आता हिंदू- मुस्लिम एकोप्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे.

येथे १३ ते १७ जानेवारीदरम्यान होणाऱ्या शिवपुराण कथा या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी मुस्लिम तरुणाने पुढाकार घेत स्वतःची ६० एकर शेतजमीन विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर यासाठी ६० पैकी ४३ एकर क्षेत्रातील तूर, साडेतीन एकरातील बहरलेल्या हरभरा पिकावर त्याने नांगर फिरविला.

परभणी येथे पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांची विख्यात शिवपुराण कथा होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खासदार संजय जाधव काही वर्षांपासून प्रयत्नात होते. या पार्श्वभूमीवर परभणीला अचानक १३ ते १७ जानेवारीदरम्यानची तारीख देण्यात आली.

पं. प्रदीप महाराज मिश्रा यांच्या या कथेला लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे एवढ्या कमी दिवसांत विस्तीर्ण जागा कुठे मिळणार? असा प्रश्न खासदार जाधव यांच्यापुढे होता. त्यांनी ‘सय्यद बिल्डर अॅँड डेव्हल्पर’चे हाजी शोएब यांना जागेसंदर्भात विचारणा केली. त्यांनी तातडीने शेतात जागा देण्याचे मान्य केले. त्यासाठी साठ एकर जागा देण्यात आली आहे.

सहन केले लाखोंचे नुकसान

हाजी शोएब यांनी प्लॉटिंग सोडून त्यांच्याच साठ एकरपैकी ४३ एकर क्षेत्रात तुरीचे पीक घेतले होते. ही जागा कथा आयोजनासाठी देऊ शकतो, असे त्यांनी खासदार संजय जाधव यांना सांगितले. परंतु, तुरीचे पीक कसे काढणार?

असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शोएब यांनी कुठलाही विचार न करता ४३ एकरवरील तुरीसह साडेतीन एकरातील हरभरा पिकावर नांगर फिरविला आणि जागा साफ करून दिली. शिवाय इतरही १४ एकर जमीन दिली. हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांनी लाखो रुपयांचे नुकसान सहन केले.

सर्वधर्म समभावाची परंपरा आम्ही परभणीकर जपत आलो आहोत. एकता व बंधुता राखण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो. काही दिवसापूर्वी झालेल्या मुस्लिम धर्मीयांच्या कार्यक्रमासाठी अनेक हिंदूंनी सहकार्य केले होते. आता या शिवपुराण कथेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. एकता हेच आमचे वैशिष्ट्य आहे.

- संजय जाधव, खासदार, परभणी

देवाचे कार्य आहे हे समजल्यानंतर ते विना अडथळा पार पडले पाहिजे असे आमचा धर्म सांगतो. त्यामुळे या पवित्र कार्यात माझा व माझ्या कुटुंबाचाही सहभाग असावा यासाठी आमच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला व जागा देऊ केली.

- हाजी शोएब, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT