
Nepal Protest
ESakal
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या विरोधात होणाऱ्या निदर्शनांबाबत भारत सरकार सावध आहे. नेपाळमध्ये वाढत्या अशांततेत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. भ्रष्टाचार आणि वादग्रस्त सोशल मीडिया बंदीविरोधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रपतींनीही राजीनामा दिला आहे. याबाबत भारत सरकारने सुचना जारी केली आहे. तसेच एक आवाहन केले आहे.