file photo
file photo 
विदर्भ

नगर परिषद सभापतीसह अभियंत्याला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : प्लॉटचा स्थायी अकृषक परवाना करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर परिषदेच्या सभापतीसह कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 9) येथील नगर परिषद कार्यालयात केली.
सचिन गोविंद शेंडे (नियोजन व विकास सभापती) तसेच शशी छोटेलाल पारधी (कनिष्ठ अभियंता, नगर रचना विभाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील तक्रारदार हे जीवन विमा अभिकर्ते आहेत. त्यांचा कुडवा येथे मालकीचा प्लॉट आहे. या प्लॉटचा स्थायी अकृषक परवाना करण्याकरिता त्यांनी गोंदिया नगर परिषदेकडे आवश्‍यक दस्तऐवज सादर केले होते. दरम्यान, या प्लॉटचा स्थायी अकृषक परवाना काढून देण्याकरिता कनिष्ठ अभियंता शशी पारधी याने त्यांना 8 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने 5 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पथकाने 5 जुलैलाच पडताळणी केली असता पारधीने रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला. शिवाय मंगळवारी नगर परिषद कार्यालयात सापळा रचला. या वेळी सभापती सचिन शेंडे याने प्लॉटचा स्थायी अकृषक परवाना तयार करून आणून दिल्याबद्दल तक्रारदाराकडे 8 हजारांची लाच मागितली व ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, प्रदीप तुळसकर, नायक पोलिस शिपाई रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, वंदना बिसेन, देवानंद मारबते यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT