SYSTEM
विदर्भ

चंद्रपूर : भद्रावतीच्या नागपंचमी यात्रेला यंदाही खोडा

सुनील पतरंगे

भद्रावती (जि. चंद्रपूर) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही शहरातील मंदिरे बंद आहे. परिणामी विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या भद्रनाग स्वामी मंदिरात भरणाऱ्या नागपंचमी यात्रेला सतत दुसऱ्या वर्षीही खोडा पडला आहे. यामुळे भाविकांत कमालीची नाराजी पसरली आहे.

भद्रनाग मंदिरात दरवर्षी नागपंचमी तथा महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नागपंचमीला येथे भरणारी यात्रा ही मोठी असते. या दिवशी विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मंदिरात येऊन भद्रनागाचे दर्शन घेतात. मात्र, गेल्या वर्षीपासून शासनाच्या आदेशानुसार मंदिरे कोरोना प्रादुर्भावामुळे बंद पडली आहे. यावर्षी प्रारंभी मंदिरे सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे यावर्षी भद्रनागाचे दर्शन घेता येईल, अशी आशा भाविकांना होती. मात्र, शासनाद्वारे मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात न आल्याने भाविक निराश झाले आहेत.

यंदा उद्या शुक्रवारी (ता. १३) नागपंचमीच्या दिवशी पहाटे पावणे सहा वाजता श्रीभद्रनाथ स्वामींचा अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात येणार आहे. यावेळी योगेश पांडे यांच्यासह भद्रनाग स्वामी विश्वस्त मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील. भद्रावती येथील भद्रनाग मंदिर वाकटाककालीन असून बांधकाम संपूर्ण हेमाडपंथी धाटणीचे आहे.

गर्भगृह आणि सभागृह असे या मंदिराचे दोन भाग आहेत. मंदिराच्या आत भद्रनाग स्वामींची मूर्ती विराजमान असून येथे महादेवाचा वास आहे. मंदिराच्या प्रांगणात दगडी पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीत भद्रनाग स्वामींचा वास असल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे या विहिरीचीही पूजा करण्यात येते. मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. दर्शनासाठी तथा नवस फेडण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक मंदिरात येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagav DCC Bank Election : जिल्हा सहकारी बँकेच्या 9 जागा बिनविरोध; सर्व बिनविरोधचे प्रयत्न फोल, 7 जागांसाठी रविवारी होणार मतदान

संघाच्या शाखेत अत्याचाराचे आरोप, आत्महत्या प्रकरणावर RSSने दिली प्रतिक्रिया; घटना दुर्दैवी पण...

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Kolhapur ZP Reservation : करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळ्याचे सभापतिपद खुले; शिरोळ, हातकणंगले अनुसूचित जमातींसाठी राखीव

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT