File photo
File photo 
विदर्भ

नागपूर @ 11.2

सकाळवृत्तसेवा

नागपूर @ 11.2
नागपूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या "गज' या चक्रीवादळामुळे मध्यंतरी गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत विदर्भात गारठा वाढला असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी नागपुरात नोंद झालेले 11.2 अंश सेल्सिअस तापमान विदर्भासह यंदाच्या मोसमातीलही नीचांकी ठरले. कोरडे हवामान लक्षात घेता थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह उत्तर भारतातील पहाडी भागांमध्ये सध्या सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भाच्या दिशेने गारठायुक्‍त वारे वाहात आहेत. शिवाय "गज' चक्रीवादळाचा प्रभावी ओसरला आहे. त्यामुळे अचानक सरासरी तापमानात दोन ते चार अंशांची घसरण झाली. सोमवारी नागपूरचा पारा आणखी एका अंशाने घसरून नीचांकी 11.2 अंशांवर आला. केवळ विदर्भातीलच नव्हे, यंदाच्या हिवाळ्यातीलही सर्वांत कमी तापमान ठरले. यापूर्वी अकरा नोव्हेंबरला नागपूरचा पारा 11.6 अंशांपर्यंत घसरला होता. विदर्भातील गोंदिया (11.5 अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (12.3 अंश सेल्सिअस), वर्धा (13.2 अंश सेल्सिअस), यवतमाळ (13.4 अंश सेल्सिअस), अकोला (13.5 अंश सेल्सिअस) येथेही थंडीचा तीव्र प्रभाव दिसून आला.
थंडीचा कडाका वाढणार
सायंकाळपासूनच हवेत गारठा पसरतो. मध्यरात्रीनंतर आणि पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता आणखीणच जास्त अधिक असते. थंडी वाढल्यामुळे कपाटातील स्वेटर्स, मफलर्ससह अन्य ऊनी कपडे बाहेर पडले असून, जागोजागी शेकोट्याही नजरेत पडताहेत. सर्वाधिक थंडीचा ओळखला जाणारा डिसेंबर महिना उंबरठ्यावर असल्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT