संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

चोरटयांचा हिसका, मंत्र्यांचे स्वागत पडले 55 हजारांत!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांचे स्वागत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हिसका दाखवत पाकिट चोरी करीत जवळपास 55 हजार चोरले. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथग्रहण केल्यानंतर प्रथमच नितीन राऊत शहरात दाखल होत होते. त्यामुळे सोमवारी 12.30 च्या सुमारास हजारो कार्यकर्ते विमानतळावर जमले होते. मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांचे स्वागत करीत होते. मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे जल्लोष सुरू होता. याचा फायदा घेऊन चोरट्याने कार्यकर्त्यांच्या खिशावर हात साफ केले.

नितीन राऊत यांचे कार्यकर्ते अजयकुमार श्रीचंद विश्वकर्मा आणि अरविंदसिंग सुरजितसिंग दिगवा (36, रा. वैशालीनगर) यांच्या खिशात अनुक्रमे 48 हजार सातशे रुपये होते. चोरट्याने त्यांच्या पॅंटच्या खिशातून पैसे व कागदपत्रे चोरली. मंत्र्यांसोबत कार्यकर्ते बाहेर पडले असता त्यांना काही वेळाने आपले पैसे कुणीतरी चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंत्र्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी विमानतळावर चोख सुरक्षाव्यवस्था असताना चोरट्याने पाकीट मारल्याची घटना समोर येताच लोकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT