संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

धक्कादायक...संचालकाची माजी विद्यार्थ्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा : महाविद्यालयाकडे असलेली रक्कम परत मिळविण्यासाठी गेलेल्या माजी विद्यार्थ्याला संस्थेचा अध्यक्ष व प्राध्यापकांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी डोंगरगाव येथील वैनगंगा महाविद्यालयात घडली. या मारहाणीत विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष दोघेही जखमी झाले आहेत. 

या घटनेनंतर विद्यार्थी व महाविद्यालय दोघांनी हिंगणा पोलिसांत तक्रार केली आहे. हिंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैनगंगा महाविद्यालयातील एमटेकचा माजी विद्यार्थी सचिन रामराव शेंडे (वय 35, रा. पालकर ले-आउट, महाजन वाडी, हिंगणा) एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. सोबतच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीदेखील प्रयत्न करतो.

चकमकीचे रूपांतर मारहाणीत

शुक्रवारी तो वैनगंगा महाविद्यालयात रक्कम परत मागण्यासाठी गेला होता. येथे त्याने प्रा. गंगवणी यांची भेट घेतली. दोघांतील चर्चेचे वादात रूपांतर झाले. यानंतर दोघेही वाद सोडविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ब्रह्मानंद करंजेकर यांच्याकडे गेले. रकमेची मागणी करताच करंजेकरही संतापले. त्यांच्यातील शाब्दिक चकमकीचे रूपांतर मारहाणीत झाले. करंजेकर यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चिथावणी दिली व सचिनवर हल्ला केला. त्यास बेदम मारहाण केली. त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. संस्थेच्या आवाराच्या बाहेर येताच सचिनही आक्रमक झाला. यात करंजेकर व सचिन शेंडे दोघेही जखमी झाले आहेत. 

शांतता झोन

हिंगणा पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, महाविद्यालय परिसर शांतता झोन असल्याने येथे केलेली मारहाण दंगासदृश कृती आहे. तर, सचिनवर संस्था संचालकास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणा पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

SCROLL FOR NEXT