File photo
File photo 
विदर्भ

ताशी 90 किमी वेगाने धावली नागपूर मेट्रो

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील मेट्रो आता पूर्ण रंगात येत असून गेल्या सात दिवसांत ताशी 90 किमी वेगाने धावली. या वेगासह मेट्रोने सिताबर्डी ते खापरीपर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण केला. त्यामुळे नागपूरकरांना आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या वेगाचा अनुभव घेता येणार आहे.
गेल्या सात दिवसांपासून रिसर्च डीझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) मेट्रो रेल्वेच्या वेगाची चाचणी घेतली. ही चाचणी शुक्रवारी संपुष्टात आली. 'आरडीएसओ'ने सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन या 11.5 किमी लांबीच्या मार्गावर ही चाचणी घेतली. मेट्रो कोचेसमध्ये चार हजार पोती भरून 90 किमी प्रती तासाने चाचणी घेण्यात आली. या मार्गावर आरडीएसओने मेट्रोच्या वेगाचे निरीक्षण नोंदविले. 970 प्रवाशांच्या वजनाइतकी म्हणजे 63 टन रेतीची पोती ट्रेन मध्ये भरण्यात आली होती. गाडीतयंत्राच्या साहाय्याने गती मर्यादा आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून 50 किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग ताशी 90 किमीपर्यंत करण्यात आला. ताशी 90 च्या वेगातही मेट्रो उत्तीर्ण झाली. महामेट्रोला 15 दिवसांत ताशी 90 किमी चाचणीचा अहवाल सादर करायचा होता. सात दिवसांत हा अहवाल सादर करण्यात आला. चाचणीदरम्यान डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. गतिमापक सेन्सर, त्यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती. 'आरडीएसओ' पथकाने मेट्रोच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते. यातून मिळणारी माहिती अधिकाऱ्यांनी संकलित केली. या अंतर्गत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशीप इंडेक्‍स, आपातकालीन ब्रेक व्यवस्था सारख्या मानकांची देखील चाचणी करण्यात आली. या सात दिवसांत पावसाळी वातावरणात विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT