Samruddhi Express Way  esakal
विदर्भ

Samruddhi Express Way : समृद्धी महामार्गावर का होत आहेत अपघात?

११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले.

सकाळ डिजिटल टीम

करिश्मा निकम

Samruddhi Express Way : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मार्ग मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून जाणारा महामार्ग दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करतो. पण मागच्या सहा-सात महिन्यामध्ये समृद्धी महामार्ग अपघातांचा मार्ग म्हणून आपल्यासमोर आला असेल. अनेक छोटेमोठे अपघात या महामार्गावर झाले, अनेक तज्ज्ञांनी चर्चा केल्या पण नेमकं समृद्धीवर होणाऱ्या अपघातांची कारणे काय आहेत ते आपल्याला माहितीये? जाणून घेऊया.

११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वायफळ टोलनाक्यावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी मोहीम घेतली. शिर्डी ते नागपूर दरम्यान असलेला ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवली पण त्यानंतर हा महामार्गावरील अपघात बघता हा समृद्धी नाही तर "स्वर्गात घेऊन जाणारा महामार्ग" असल्याची टीका सरकरावर झाली. मागच्या सहा ते सात महिन्यापासून समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे.

डिसेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान किती झाले अपघात?

एकूण अपघात - ३१५

एकूण किरकोळ जखमी - ४२८

एकूण गंभीर जखमी - २२२

एकूण मृत्यू - ८८

जाणून घेऊया अपघात होण्यामागची कारणे

६०० किलोमीटर असलेल्या या समृद्धी महामार्गावर १२० च्या वेगाने वाहने चालतात. या मार्गामध्ये कोठेही अडथळे किंवा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे शंभर चा स्पीड कधी १२० होतो हे चालकाला कळत नाही. स्पीड वाढल्यामुळे टायर गरम होतात व ते फुटतात. छोटी गाडी असेल तर स्पीड कंट्रोल होत नाही. महामार्गावर कुठेच थांबा नसल्यामुळे वाहन स्पीड मध्ये असते त्यामुळे रोड हिप्लोटाइज हा प्रकार चालकासोबत होतो. या सर्व कारणांमुळे तेथे अपघात होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

उपाय

  • या महामार्गावर प्रत्येकी शंभर किलोमीटरवरती थांबण्यासाठी स्पॉट पाहिजे.

  • दोन-तीन तास चालल्यानंतर चालकाचे लक्ष विचलित करण्यासाठी छोटे स्पीड ब्रेकर पाहिजेत.

  • महामार्ग सुरू होताना नायट्रोजन हवा चेक करण्यासाठी स्पोर्ट पाहिजे.

  • ड्रिंक आणि ड्राइव्ह टेस्ट करण्यासाठी चेक पोस्ट पाहिजे.

  • ठिकठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आणि धोकादायक वळणे चिन्हांकित केलेले पाहिजेत.

  • ज्या वाहनांचे टायर्स सुसंगत नाहीत, खराब स्थिती किंवा जीर्ण आहेत त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी सक्त बंद केली पाहिजे. त्यांना एक्सप्रेस वेमध्ये प्रवेश नाकारला जावा.

  • ओव्हर स्पीडिंग आणि लेन कटिंगमध्ये गुंतलेल्या वाहनांवर लक्ष ठेवावे.

  • या उपाय योजना केल्या तर समृद्धी महामार्गावरील अपघाताची संख्या कमी होईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT