विदर्भ

बल्लारपुरात रेल्वेची ‘लाइफ लाइन’ एक्‍स्प्रेस

मंगेश बेले

बल्लारपूर - राज्य शासनाने रेल्वे विभागाच्या पुढाकारातून ‘लाइफ लाइन’ एक्‍स्प्रेस सुरू केली. नागरिकांना जलदगतीने अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, हा मुख्य उद्देश होता. जगातील पहिले चालते फिरते रुग्णालय नुकतेच बल्लारपुरात पोहोचले.

या रुग्णसेवेत २० तज्ज्ञ, टेक्‍निशियन, मदतनीस आहेत. मोठ्या शहरातील ४० नामांकित तज्ज्ञ डॉक्‍टर या रुग्णालयाशी संलग्न आहेत. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे परीक्षण, डोळे, कानाचे आजार, ओठ, मिरगी, दंतरोग, परिवार नियोजन या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय बाहेरून येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून परिसरातील शिकाऊ डॉक्‍टरांना अत्याधुनिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार आहे. ही नि:शुल्क उपचारसेवा १ ते १८ डिसेंबर या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याकरिता रुग्णांना आपली  नोंदणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान बचतभवन येथे करता येणार  आहे. 

नोंदणीनुसार रुग्णांना वेळ दिला जाईल. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णाला व एका सहकाऱ्याला नि:शुल्क जेवण व निवासाची सुविधा दिली जाणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या अत्याधुनिक रुग्णसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाइफ लाइन एक्‍स्प्रेसचे उपनिदेशक अनिल धारसे, स्टेशन निरीक्षक देवीदास कुमरे, नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.

आज मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रारंभ
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी (ता.२७) सकाळी ११ वाजता या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्‍यामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी उपस्थित राहणार आहेत.

लाइफ लाइन एक्स्प्रेसच्या माध्यमातून रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. 
- देवीदास कुमरे, निरीक्षक, रेल्वे स्टेशन, बल्लारपूर

राज्य शासन व रेल्वे विभागाच्या वतीने देशात हा उपक्रम राबविला जात आहे. ही लाइफ लाइन रुग्णसेवा प्रथमच शहरात आली आहे. त्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार. 
- हरीश शर्मा, नगराध्यक्ष, नगरपालिका, बल्लारपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT