विदर्भ

बाजारात 3360 दर, मनपा देणार 9900 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - महापालिकेत वाहन साहित्य खरेदी घोटाळा उघडकीस आणणारे कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी शहरात लावण्यात येणाऱ्या एलईडी लाइट्‌स फिटिंगमध्ये गैरप्रकाराचा आरोप केला. 36 वॉटच्या एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी बाजारात 3360 रुपये दर आहे. मात्र, मनपाने कंत्राटदाराला 9900 रुपये प्रतिएलईडी लाइट दर देण्याचे निश्‍चित केल्याचे नमूद करीत सहारे यांनी कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी सभागृहात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पाऊल टाकले. 

मनपाने शहरातील पथदिवे बदलण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली. स्थायी समितीने दहाही झोनमधील एक लाख 24 हजार 627 पथदिवे बदलून एलईडी लाइट्‌स लावण्याची निविदा डिसेंबर 2016 मध्येच मंजूर केली. या निविदेचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या भागात केबल बदलविणे तसेच जुने खांब काढून नवीन खांब लावण्यासंबंधी आहे. ही निविदा 59.03 कोटींची आहे. विशेष म्हणजे निविदा 80 टक्के अधिक दराने दिल्याबाबत सहारे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. काम पूर्ण झाल्यानंतर जी देय रक्कम असेल, त्यापेक्षा 80 टक्के जास्त दराने कंत्राटदाराला बिल देण्यात येईल. याशिवाय निविदेचा दुसरा भाग एलईडी लाइट लावण्याचा असून दहाही झोनसाठी 158.99 कोटी खर्च करण्यात येणार आहे. हे कामही 70 टक्के अधिक रकमेत मंजूर करण्यात आले. प्रत्येक झोनसाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनचे काम साधना इलेक्‍ट्रिकल वर्क्‍स, धरमपेठ झोनचे काम निशांत इलेक्‍ट्रिकल्स, हनुमाननगर, धंतोली व सतरंजीपुरा झोनचे काम सोनू इलेक्‍ट्रिकल्स, नेहरूनगर झोनचे काम दत्त इलेक्‍ट्रिकल्स, गांधीबाग झोनचे काम लिंक इंटरप्रायजेस, लकडगंज झोनचे काम राहुल कन्स्ट्रक्‍शन, आशीनगर झोनचे काम अनिल इलेक्‍ट्रिकल्स ऍण्ड असोसिएट्‌स, मंगळवारी झोनचे काम बालाजी असोसिएट्‌सला देण्यात आले. विशेष म्हणजे एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी 9900 रुपये शुल्क देण्याचे मनपाने निश्‍चित केले. मात्र, बाजारात एका एलईडी लाइटच्या फिटिंगसाठी 3360 रुपये आहे. मनपा विशेष कंपनीकडून लाइट्‌स तयार करून घेत असल्याने 9900 रुपये दर पडत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केल्याचे सहारे म्हणाले. एखाद्या कंपनीकडून लाइट्‌स तयार करून घेताना बाजारदरापेक्षा दोन हजार रुपयेही जास्त दिले तरी महापालिकेचे पैसे वाचतील, असेही सहारे म्हणाले. 

81 कोटींचा घोटाळा? 
दहा झोनमध्ये 1 लाख 24 हजार 627 एलईडी लाइट्‌स लावण्यात येणार आहेत. महापालिका एका एलईडी लाइट्‌सच्या फिटिंगसाठी 9900 रुपये देणार आहे. अर्थात, 1 लाख 24 हजार 627 लाइट्‌साठी 123 कोटी 38 लाख 7 हजार 300 रुपये कंत्राटदाराला देण्यात येतील. सहारे यांच्यानुसार बाजार दराने एलईडी लाइट्‌सच्या फिटिंगसाठी 41 कोटी 87 लाख 46 हजार 720 रुपये खर्च येईल. एकूण 81 कोटी 50 लाख 60 हजार 580 तफावत असून याबाबत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सहारे म्हणाले. 

झोननिहाय एलईडीची संख्या 
झोन---एलईडी 
लक्ष्मीनगर---16,675 
धरमपेठ---9,203 
हनुमाननगर---15,723 
धंतोली---7,800 
नेहरूनगर---14,636 
गांधीबाग---7,944 
सतरंजीपुरा---9,973 
लकडगंज---14,315 
आशीनगर---13,253 
मंगळवारी---15,102 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT