विदर्भ

गुणपत्रिका होणार ‘डिजिटल’

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पदवी आणि गुणपत्रिका मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागते. शिवाय एखाद्या विद्यार्थ्यांना विदेशात किंवा दुसऱ्या राज्यात नोकरी मिळाल्यावर स्वत:च्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. ही प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी विद्यापीठाने केंद्र शासनाच्या ‘एनएडी’सोबत (नॅशनल एज्युकेशन डिपॉझिटरी) ‘लिंक’ केले आहे. यासंदर्भात सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून विद्यार्थ्याची पदवी, गुणपत्रिकांना ‘डिजिटल’ स्वरूप मिळणार आहे. विशेष म्हणजे येत्या दीक्षान्त समारोहापासून पीएच.डी.चे प्रमाणपत्रही डिजिटल स्वरूपात देण्याचे ठरविले आहे. 

देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत, यासाठी केंद्र शासनाने ‘एनएडी’सेवा सुरू करण्याची घोषणा केली. राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या  ‘ई-रिफॉर्म्स‘च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता सहा महिन्यांअगोदर यासंदर्भात विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली व विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे ‘डिजिटल’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत विद्यापीठ प्रशासनाने चर्चा करुन दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला. आता दीक्षांत समारंभात पदवी आणि पीएच.डी. प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका जगातून कुठूनदेखील पाहता येतील. यासंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात येईल अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

रेकॉर्ड डिजिटल करणे कसरत
नागपूर विद्यापीठाची स्थापना १९२३ मध्ये झाली. रेकॉर्ड रुमकडे १९५८पासून सर्व प्रमाणपत्र आहेत. मात्र, हे सर्व जुने झाल्याने खराब होण्याच्या दिशेने आहेत. त्यामुळे एवढी जुने रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी कसरत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT