विदर्भ

‘प्लास्टिक’चे  ग्रहण

राजेश प्रायकर

नागपूर - प्लास्टिकमुळे शहराचे प्रदूषण वाढत आहे. शिवाय उद्यानांत, तलावात, रस्त्यांवर पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बॉटल्समुळे शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडली आहे. शहरातील सर्वच दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असतानाही महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे स्मार्ट सिटी? अशी होईल, असा प्रश्‍न नागरिक, पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.

ड्रेनेज, सिवेज लाइनसाठी घातक 
प्लास्टिक पिशव्या उडून ड्रेनेज, सिवेज लाइनमध्ये शिरत आहेत. परिणामी ड्रेनेज लाइन, सिवेज लाइन तुंबण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहे. तुंबलेल्या ड्रेनेज, सिवेज लाइनची सफाई करणारे त्यातून प्लास्टिकच अधिक प्रमाणात बाहेर येत असल्याचे सांगतात. प्लास्टिकवर बंदीचा  अधिकार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे अन्‌ सफाई कर्मचारीही याच विभागाअंतर्गत आहे. परंतु, अद्याप विभागाला प्लास्टिकवर निर्बंधासाठी जाग आली नाही. 

जनावरांवर परिणाम 
प्लास्टिक पिशव्या या नाग नदी, तलावांमध्ये दिसून येत आहे. शहरातील गायी, म्हशी मोठ्या प्रमाणात नाग नदी, पिवळी नदी परिसरात फिरताना आढळून येते. याशिवाय अनेकजण शिळे अन्न प्लास्टिक पिशव्यांतून कचरा साठविण्याच्या ठिकाणी फेकतात. या अन्नावर ताव मारण्याच्या नादात गायी, म्हशी या प्लास्टिक पिशव्याही गिळतात. गेल्या काही वर्षात जनावरांच्या मृत्यूचे कारण प्लास्टिक असल्याचे पशुवैद्यकीय अहवालाने स्पष्ट केले आहे. 

 प्रक्रियेचा अभाव 
कमी जाडीच्या पिशव्याचा पुनर्वापर शक्‍य आहे. परंतु, प्लास्टिकच्या बॉटल, बादलीचे तुकडेही मोठ्या प्रमाणात कचऱ्यात दिसून येते. परंतु, महापालिकेकडे त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे डम्पिंग यार्डमध्ये या प्लास्टिकचा ढिगारा लागला आहे. यातून भांडेवाडीतील  डम्पिंग यार्डमध्ये सतत आगीच्या घटना होत असून, वायू प्रदूषणाचा धोका वाढला असून शहरात विदारक चित्र निर्माण झाले आहे. 

वायुप्रदूषणातही भर 
शहरात जमा झालेले प्लास्टिक अनेकदा जाळतात. त्यामुळे वायू प्रदूषणातही भर पडली आहे. कचरा जाळणे हा गुन्हा असतानाही ‘कनक’च्या कर्मचाऱ्यांकडून तर कधी सफाई कर्मचाऱ्यांकडून प्लास्टिक जाळले जाते. यातून क्‍लोरिन, ब्रोमाईनची निर्मिती होत असून, या वायू प्रदूषणामुळे पृथ्वीच्या आवरणालाही गंभीर धोका होत आहे. पर्यावरण आणि आरोग्य, अशा दोन्ही पातळीवर शहराला गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT