विदर्भ

आमदार आबीटकर कर्जमाफीचे लाभार्थी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाने घातलेले घोळ आता पुढे येऊ लागले आहेत.  शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी कर्जमाफीचा अर्ज न करताही त्यांच्या खात्यावर २५ हजार रुपये जमा झाले आहेत.

शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर (राधानगरी, जि. कोल्हापूर) यांनी शुक्रवारी औचित्याचा मुद्या उपस्थित करून कर्जमाफीचा ‘मी लाभार्थी’ झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आबीटकर यांचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गारगोटी येथील शाखेत खाते आहे. या खात्यावर १४ डिसेंबर २०१७ रोजी अचानकपणे २५ हजार रुपये जमा झाले. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये आबीटकर येत नाही. त्यामुळे आमदार आबीटकर यांनी अर्ज केला नव्हता; परंतु ‘आयटी’ विभागाने घोळ घालून आमदारांना लाभार्थी ठरविले.

या संदर्भात सभागृहात बोलताना आबीटकर म्हणाले, की राज्य सरकारच्या ‘आयटी’ विभागाच्या चुकीमुळे ही रक्कम माझ्या खात्यात जमा झाली आहे. ही रक्कम एखाद्या पात्र व्यक्तीला देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा केला होता; परंतु यात बराच घोळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी राज्य सरकारचा आयटी विभाग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT