Student suicide sakla
विदर्भ

Student Suicide: अभ्यासासाठी रागावल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

याशिवाय ती शाळेतून कोणत्या ना कोणच्या बहाण्याने घरी लवकर येत असल्याचेही आढळले. त्यामुळे २१ फेब्रुवारीला आईने तिला रागावले. दरम्यान तो राग मनात धरून घरी कुणीही नसताना २१ फेब्रुवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास नंदिनीने विष प्राशन केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अभ्यास आणि शाळेत जाण्यासाठी आईने रागावल्याने १५ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कळमना पोलिस हद्दीतील कळमना वस्ती येथे घडली.

नंदिनी महेश लांजेवार असे मृताचे नाव आहे. ती नववीत शिकत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. गेल्या काही दिवसांपासून नंदिनी अभ्यास करीत नसल्याची बाब आईला कळली.

याशिवाय ती शाळेतून कोणत्या ना कोणच्या बहाण्याने घरी लवकर येत असल्याचेही आढळले. त्यामुळे २१ फेब्रुवारीला आईने तिला रागावले.

दरम्यान तो राग मनात धरून घरी कुणीही नसताना २१ फेब्रुवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास नंदिनीने विष प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती खालावली.

नातेवाइकांनी तिला नंदनवनमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. नंदिनीला लहान बहीण आहे. तीही तिच्यासोबत एकाच शाळेत शिकते. पोलिस उपनिरीक्षक मनोज राऊत यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT