vikram lander 
विदर्भ

विक्रम प्लिज रिप्लाय दे, दंड करणार नाही; पोलिसांचे ट्विट

वृत्तसंस्था

नागपूर : भारताची चांद्रयान-2 मोहिम यशस्वी करणाऱ्या विक्रम लँडरशी अद्याप संपर्क होत नसला तरी नागपूर पोलिसांनी अनोखे ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या देशभरात वाहतूक दंडाबाबत चर्चा सुरु असतानाच नागपूर पोलिसांनी यावरून ट्विट केले आहे.

नागपूर पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे, की डियर विक्रम, प्लिज प्रतिसाद दे. तू कोणतेही सिग्नल तोडले असले तरी आम्ही तुला दंड करणार नाही.  

शनिवारी पहाटे भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेला शेवटच्या टप्प्यात ‘ग्रहण’ लागले. चंद्राच्या पृष्ठ भागापासून 2.1 किलोमीटवर असताना इस्रो मुख्यालयाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांसह तमाम भारतीयांची निराशा झाली. पण, चंद्राच्या भोवती फिरणारा ऑर्बिटर सुरक्षित असल्याने त्याच्याकडून मिळालेली माहिती आता शास्त्रज्ञांना दिलासा देणारी आहे. विक्रम लँडर दोन किलोमीटर अंतरावरून चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळला आहे. पण, सुदैवाची गोष्ट ही की त्याचे तुकडे न होता तो सुरक्षित आहे. लँडरच्या आता प्रग्यान हा रोव्हर आहे. सध्या विक्रम लँडर आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे लँडरला कमांड देण्यात इस्रो मुख्यालयातील शास्त्रज्ञांना अडथळे येत आहे. सुदैवाने लँडर सुरक्षित योग्य पोझिशनला उतरला असल्यामुळे त्याच्या संपर्क होण्याच्या आशा कायम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT