Prakash Ambedkar  Esakal
विदर्भ

Prakash Ambedkar: आंबेडकरांचा 'एकला चलो रे'चा नारा! उमेदवारांची यादी जाहीर करताना म्हणाले, 'वंचितचा वापर घराणेशाही....'

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची लोकसभा निवडणुकीतील वाटचाल काय असेल हे बुधवारी अकोल्यात पत्रकार परिषदेतून जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

Vanchit Bahujan Aghadi Declared Candidate List: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची लोकसभा निवडणुकीतील वाटचाल काय असेल हे बुधवारी अकोल्यात पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यांनी पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

वंचितची भूमिका स्पष्ट करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी मंगळवारी भेट घेवून चर्चा केली. चर्चेदरम्यान आतापर्यंत ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाईल असे ठरले. परिवर्तनाच्या राजकारणाबाबत सखोल चर्चा झाली.

जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब समुदायातील असतील आणि त्यांनाच पुढे आणले जाणार आहेत. जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, गरीब आहेत आणि काहीतरी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. बाकी जागांची अंतिम यादी ही २ एप्रिलपर्यंत जाहीर होईल. एक नवीन आघाडी आम्ही उभी करत आहोत, जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही सांगत होतो की, जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पण ते मान्य करायला तयार नव्हते.

वंचित बहुजन आघाडीचा वापर हे घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते की, ज्याला आम्ही पूर्णपणे नाकारले आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम यांची नवीन वाटचाल आहे असे आम्ही मानतो. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली.

असे आहेत वंचितचे उमेदवार

अकोला- ॲड. प्रकाश आंबेडकर, भंडारा-गोंदिया संजय गजानद केवट, गडचिरोली-चिमूर हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर राजेश वारलूजी बेले, बुलडाणा वसंत राजाराम मगर, अमरावती प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान, वर्धा प्रा. राजेंद्र साळुंके, यवतमाळ-वाशिम साठी सुभाष खेमसिंग पवार हे वंचितचे लोकसभा निवडणूकीचे उमेदवार असून अर्ज भरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : मकर संक्रांतीला सोनं खरेदी करायचा विचार करताय? आधी आजचे भाव पाहा आणि मग खरेदी करा

Kolhapur Missing Ex Sarpanch : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती? कोल्हापुरातील माजी सरपंच बेपत्ता, जंगलात जळालेली हाडे सापडली अन्

वास्तव की भ्रम? मानसशास्त्रीय थ्रिलर ‘केस नं. ७३’मध्ये अशोक शिंदेंचा दमदार कमबॅक

WPL 2026 : मुंबई इंडियन्स, RCB च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; नवी मुंबईतील सामन्यांत ३ दिवस प्रेक्षकांना परवानगी नाही, कारण...

Pune Temperature : पुण्यात तापमानाचा विचित्र खेळ; दहा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा अंशांपर्यंतची तफावत

SCROLL FOR NEXT