नागपूर : शनिवारी सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने रस्त्यांवर अशाप्रकारे धुळीचे साम्राज्य पसरले. ज्यामुळे समोरचा व्यक्‍ती दिसणेही कठीण झाले होते.
नागपूर : शनिवारी सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने रस्त्यांवर अशाप्रकारे धुळीचे साम्राज्य पसरले. ज्यामुळे समोरचा व्यक्‍ती दिसणेही कठीण झाले होते.  
विदर्भ

वादळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा

सकाळवृत्तसेवा

नागपूर : शनिवारी सायंकाळी अचानक वादळवाऱ्याने जिल्ह्याला तडखा दिला. वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असल्याने अनेकांच्या घराचे छप्पर उडाले. रस्त्यांवरून जाताना गाड्यांची चाके थांबली. थोडीफार पडझडही झाली. सुमारे अर्धा तास वादळाने धुमाकूळ घातला. त्यात पावसाच्या सरीही कोसळल्याने पाऱ्यात मोठी घसरण झाली. गेल्या महिनाभरापासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या नागपूरकरांना त्यामुळे दिलासा मिळाला.
हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात वादळवाऱ्याचा इशारा दिला होता. तो तंतोतंत खरा ठरला. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. वादळाला सुरुवात झाली. पाऊसही कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यांवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना गाड्या चालवणेही अशक्‍य झाले होते. पानटपऱ्या, रस्त्यावरील छोट्यामोठ्या दुकानदारांचे छप्पर उडाली. त्यामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचा गोंधळ उडाला होता.
रेशीमबागवर तारांबळ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी रेशीमबाग मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला होता. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्याने मंडप उडाला. ध्वनियंत्रणा तसेच एलएडी वॉलदेखील कोसळून पडली. प्रभाग क्रमांक 17 येथे विजेचा खांब कोसळला.
दोन दिवस इशारा
हवामान खात्याने नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. नवतपात तापमान वाढल्याने वैदर्भीय हैराण झाले होते. दोन दिवसांपूर्वी नागपूरचे तापमान 47.5 अंशांवर पोहोचले होते. मात्र, शुक्रवारपासून सायंकाळी येणाऱ्या वादळामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. शनिवारी दिवसभर 43.08 अंश तापमान होते. सायंकाळी त्यात सुमारे दहा अंशांनी घट झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT