राकेश सोनटक्‍के  
विदर्भ

काटोलचे राकेश सोनटक्‍के युद्धसरावात शहीद

सकाळ वृत्तसेवा

काटोल : येथील पेठबुधवारचा रहिवासी असलेल्या राकेश देवीदास सोनटक्‍के या सैनिकाचा युद्धसरावादरम्यान मृत्यू झाला. ते आसाम राज्यात तैनात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच काटोलात शोककळा पसरली आहे. 

राकेश सोनटक्‍के हे 502 आर्मी सप्लायर कोर आसाम डिगजाम येथे तैनात होते. वीस दिवसांपूर्वी नियमित युद्धसराव करीत असताना त्यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वीस दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांची रविवारी रात्री 11:50 वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी रुचिता, पृथ्वी हा एक वर्षाचा मुलगा, वृद्ध पिता, आई रेखा, थोरला भाऊ रोशन व धाकटा सूरज यांसह बराच मोठा आप्तपरिवार आहे. राकेश यांचे दोन भाऊ रोजमजुरीचे काम करतात, अशी माहिती मिळाली आहे. 

बुधवारी काटोल येथे अंत्यंसंस्कार 
कोलकाता येथून राकेश यांचा मृतदेह आणण्यात येत आहे. मृतदेह नागपूरला मंगळवारी रात्री पोहोचणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता पेठबुधवार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती काटोल सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे रत्नाकर ठाकरे यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

गौतमीच्या गळ्यात 'कोणाच्या' नावाची साखळी, नेटकऱ्यांनी काढलं शोधून, म्हणाले...'आयुष्यात कोणाची एन्ट्र्री झाली की...'

Latest Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत मोर्चा

Numerology : 'या' 5 मुलांकाचे लोक कटकारस्थान करून बिघडतात दुसऱ्याचं आयुष्य, समोर चांगले वागून सोयऱ्यांच्याच पाठीत खुपसतात खंजीर

Yoga For Travel: लांब फ्लाइटमध्ये थकवा आणि अंगदुखी त्रास देतायत? मग ५ मिनिटांचा ‘इन-फ्लाइट योगा’ नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT