विदर्भ

शहरातील देहव्यापार झाला "हायटेक'

अनिल कांबळे

शहरातील देहव्यापार झाला "हायटेक'
नागपूर : शहरातील लॉज, फार्महाउस, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर ऍण्ड स्पा व लेडीज जिममध्ये सुरू असलेला देहव्यापार "हायटेक' झाला आहे. ब्युटी पार्लरमधील देहव्यापाराचा धोका पाहता अनेक महिला दलालांनी आंबटशौकिनांना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. व्हॉट्‌सऍपवरून मुलींचे अर्धनग्न फोटो व रेटकार्ड पाठवून देहव्यापाराचा नवा फंडा सुरू केला आहे.
शहरातील ब्युटी पार्लर, हॉटेल्स व लॉजवर गुन्हे शाखा पोलिसांची नजर असल्यामुळे अनेक महिला दलालांनी आंबटशौकीन ग्राहकांना रिझविण्यासाठी व्हॉट्‌सऍप व फेसबुकचा वापर करणे सुरू केले आहे. महिला दलाल व्हॉट्‌सऍपवरून उपलब्ध असलेल्या तरुणींचे अर्धनग्न फोटो व रेट ग्राहकांना पाठवीत आहेत. व्हॉट्‌सऍपवरूनच ग्राहक मुलींची निवड करतो आणि महिला दलालांशी सौदा करतो. मॅसेजच्या स्वरूपात तडजोड केली जाते. सौदा पक्‍का होताच तरुणीचा थेट मोबाईल क्रमांक ग्राहकांना देण्यात येतो.
ग्राहकांच्या मागणीनुसार व्हिडिओ कॉलद्वारे तरुणींची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येतो. यामध्ये ब्युटी पार्लर किंवा "मसाज ऍण्ड स्पा'मधील तरुणी व्हॉट्‌सऍप व्हिडिओच्या माध्यमातून अंगप्रदर्शन करते. त्यानुसार तरुणीचा रेट लावण्यात येतो. अल्पवयीन मुलींना जोरात मागणी आहे. सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलाल ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्यानंतरच अल्पवयीन मुलींचा सौदा करीत आहेत. साधारणतः 12 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींचा 5 ते 20 हजारांत महिला दलाल सौदा करीत आहेत. त्यांची 15 ते 20 सेकंदांची व्हिडिओ क्‍लिप हवी असल्यास आधी पैसे भरण्याची सूचना केली जाते. पैस न भरल्यास "ब्लॉक' करण्यात येते.
पेटीएम-भीम ऍपने स्वीकारतात पैसे
देहव्यापार एवढा हायटेक झाला की, दलाल थेट पेटीएम किंवा भीम ऍपने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात. तरुणीचा फोटो व मोबाईल क्रमांकासह पेटीएम व बारकोडही पाठवितात. पेटीएमने पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरच तरुणीचा पत्ता देण्यात येतो. नागपूर पोलिसांच्या खाऊ वृत्तीमुळे पूर्वी तुरळक असलेला देहव्यापार आता जवळपास अर्ध्या शहरात पसरला आहे.
दलाल-पोलिसांत "दोस्ती'
अनेक ठाणेदारांच्या परवानगीने पोलिस ठाण्याच्या हद्दीत सेक्‍स रॅकेट सुरू आहेत. देहव्यापार सुरू करण्यासाठी महिला दलालाला एसएसबीकडे पाठविण्यात येते. तेथून परवानगी मिळाल्यानंतर ठाणेदाराशी "अर्थपूर्ण' चर्चा केली जाते. महिन्याच्या दोन तारखेला महिला दलाल आणि विशेष पोलिस कर्मचाऱ्यांच्या भेटी ठरलेल्या असतात, अशी माहिती पोलिस कर्मचाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT