crime news  sakal
विदर्भ

नागपूरच्या व्यापाऱ्याचा पागोरा जंगलात खून

पवनी तालुक्यातील कलेवाडा-पागोरा येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कलेवाडा-पागोरा रस्त्यालगकत जंगलात गुरुवारी दुपारी गुराख्यांना एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय आहे.

पवनी तालुक्यातील कलेवाडा-पागोरा रस्त्याचा बाजूला जंगलात गुराखी जनावरे चारण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना पागोरा गावाजवळ रस्त्याचा बाजूला स्विफ्ट कार (क्रमांक एमएच ४९ एई २१३९) संशयास्पद स्थितीत दिसली.

त्यानंतर रस्त्यापासून जवळपास २०० मीटर अंतरावर एका युवकाचा मृतदेह दिसून आला. याबाबत गावात माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली. मृताची धारदार शस्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याचे दिसून आले.

मृत नागपूर येथील हार्डवेअर विक्रेता असून त्याचे नाव अनिकेस क्षीरसागर असे आहे. तो आपल्या व्यवसायानिमित्त आपल्या कारने आला असावा, अशी शंका आहे. त्याच्या कारमध्ये लॅपटॉप व मोबाईल आढळून आले. याची माहिती मिळताच अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू , जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण घटनास्थळी पोहचले. मृतदेहाजवळील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटविण्यात आली. त्याचा खूनामागील घटनाक्रमाबाबत भंडारा पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT