nagpur university blames colleges for mistakes in online exams 
विदर्भ

पेपर दिला, पण निकालात दाखवलं अनुपस्थित; विद्यापीठ म्हणतंय महाविद्यालयाची चूक

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलेल्या ऑनलाइन परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. मात्र, गुणपत्रिकांमध्ये काही प्रमाणात चुका असल्याचे दिसून येत असून तक्रारींचे संपूर्ण खापर विद्यापीठावर फोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात महाविद्यालयांच्या चुकांमुळेच या चुका झाल्या असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नुकतेच बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याचे दोन विषयाचे पेपर होते. विद्यार्थ्याच्या सांगण्यानुसार, त्याने दोन्ही विषयाची परीक्षा दिली असून पेपर जमा झाल्याचा अंतिम संदेशही आला. त्याचे स्क्रीन शॉटही विद्यार्थ्याकडे आहेत. याशिवाय विद्यापीठाने परीक्षेत अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात विद्यार्थ्यांचे नाव नव्हते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी.च्या निकालात शुभमला दोन्ही विषयात अनुपस्थित दाखवण्यात आले. मात्र, हा विद्यार्थी २०१७ पासून परीक्षा देत असून त्याच्या अनुत्तीर्ण विषयाचे गुण महाविद्यालयाने तीन वर्षांपासून विद्यापीठाला पाठवलेच नाही. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षेचे गुण विद्यापीठाला न मिळाल्याने त्याचा निकाल जाहीर करणे अशक्य असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांच्या अशा विविध तक्रारींचा निवाडा लावताना अनेकदा महाविद्यालयांकडून होणाऱ्या चुकांचे खापर विद्यापीठावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT