file photo 
विदर्भ

महाविद्यालय ते परीक्षेसाठी नेमा "आययूएमएस' 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील 14 विद्यापीठांमध्ये महाविद्यालय ते परीक्षेचे सर्वच काम "इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम' (आययूएमएस) कंपनीमार्फत करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. बुधवारी (ता.27) विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

विद्यापीठाद्वारे चार विविध कंपन्यांमार्फत परीक्षा, महाविद्यालय विभाग, वित्त आणि इतर सर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने परीक्षेच्या संपूर्ण कामाची जबाबदारी प्रोमार्क सॉफ्टवेअर कंपनीकडे, वित्त व लेखा विभागासाठी पी. एम. नेटवर्क, महाविद्यालय विभागासाठी लॅंबेरिअन तर इतर सर्व कामांसाठी सॉफ्ट पॉलिमोरीअल कंपनीची मदत घेतली जाते. गेल्या दोन वर्षांत विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात सर्वकाही ऑनलाइन करण्यासाठी प्रोमार्कने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यामुळे आज परीक्षा विभागाद्वारे ऑनलाइन प्रवेशपत्रापासून तर ऑनलाइन मूल्यांकनापर्यंतची कामे सुरळीत होतात. वेळेवर निकाल लावण्यात विद्यापीठाने रेकॉर्ड केला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील 14 अकृषी विद्यापीठांमध्ये आता विविध कंपन्यांमार्फत सर्व कामे करण्याऐवजी "आययूएमएस' कंपनीमार्फत ती करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले. "आययूएमएस' कंपनीद्वारे परीक्षा ते महाविद्यालय आणि इतर सर्वच कामे करण्याचे ठरविण्यात आले.

या आदेशानुसारच बुधवारी (ता.27) विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिवसह व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी "आययूएमएस'च्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी कंपनीद्वारे कामाचे स्वरूपही स्पष्ट करण्यात आले. चर्चेत विद्यापीठात कंपनीद्वारे करण्यात येणाऱ्या कामाबद्दल माहिती घेण्यात आली.

मात्र, कंपनीच्या कामावर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचेही समाधान झाले नसल्याने अद्याप या कंपनीला काम देण्यासंदर्भात विद्यापीठाकडून अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते. दरम्यान, याबद्दल विद्यापीठाद्वारे यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याचे समजते. 

"एमकेसीएल'प्रमाणे घोळ होण्याची शक्‍यता 

राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षांची जबाबदारी एमकेसीएलकडे होती. यापैकी नागपूर विद्यापीठातही एमकेसीएलद्वारे परीक्षेची जबाबदारी देण्यात आलेली होती. मात्र, कंपनीकडे काम असताना परीक्षांमध्ये बरेच घोळ समोर येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा "आययूएमएस' यांच्याद्वारे असेच घोळ झाल्यास पुन्हा परीक्षा विभागाचे कामाला खीळ बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 
महाविद्यालयांकडून वर्षाला 18 हजार रुपये 

"आययूएमएस'द्वारे केवळ विद्यापीठ नव्हे तर महाविद्यालयांना सेवा देण्यात येणार आहे. या सेवांसाठी कंपनीद्वारे वर्षाकाठी 18 हजार रुपये द्यावे लागणार आहे. हे पैसे सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांनाही द्यावे लागणार आहे. अनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळत असल्याने त्यांना ते शक्‍य आहे. मात्र, विनाअनुदानित महाविद्यालय ते पैसे कसे देणार? हा प्रश्‍न आहे. 
 
दोन विद्यापीठांकडून स्वीकार 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सोलापूर आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने "आययूएमएस' कंपनीचा स्वीकार केला. मात्र, या विद्यापीठाचे क्षेत्र छोटे असल्याने त्यांना ते सोपे आहे. याउलट इतर पारंपरिक विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने या विद्यापीठांना या कंपनीकडून काम करवून घेणे तारेवरची कसरत ठरणार आहे. 

राजकीय दबाव 

"आययूएमएस' कंपनीद्वारेच विद्यापीठांचे काम करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र, केंद्रातील एका बड्या राजकीय नेत्यांच्या पुत्राची ही कंपनी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या नेतापुत्राला फायदा पोहोचविण्यासाठीच या कंपनीमार्फत विद्यापीठाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश आहेत. यामुळे विद्यापीठांवर राजकीय दबाव आहे. यातूनच काही विद्यापीठांनी कुठलेही आढेवेढे न घेता स्वीकार केल्याचे समजते. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT