विदर्भ

प्रियकराने केला प्रेयसीच्‍या पतीचा खून

सकाळवृत्तसेवा

आरोपी मुनघाटे यास अटक

नागपूर - अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्री अजनीत घडली. मनोज अण्णाजी लोणकर (वय ४५, रा. मिरे ले-आउट, नंदनवन) असे मृताचे, तर इशांत चंद्रकांत मुनघाटे (वय २०, रा. शेषनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

मनोज लोणकर हा एका कुरिअर कंपनीत कुरिअर बॉय होता. त्याची पत्नी सोडून गेली होती. नंदनवनमध्ये राहणाऱ्या या घटस्फोटित मोनूशी (बदललेले नाव) त्याचे संबंध जुळले. दोघेही घटस्फोटित असल्याने नातेवाइकांनी त्यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न लावून दिले होते. दोघांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते. दोघेही नंदनवनमधील गुरुदेवनगरात राहत होते. मनोजला दारूचे व्यसन होते. त्यामुळे दोघांत लग्नानंतर खटके उडू लागले.

मोनूचे शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय इशांत मुनघाटे याच्याशी तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. दोघांच्याही भेटी वाढू लागल्या. पती मनोज ड्यूटीवर कामावर गेल्यानंतर इशांत तिच्या घरात असायचा. इशांत आपला दूरचा नातेवाईक असल्याचे सांगून तिने त्याला घरातच ठेवून घेतले होते. १७ वर्षांच्या इशांतने शिक्षण सोडून मोनूच्या नादात पेंटिंगची कामे करणे सुरू केले. आलेल्या पैशातून मोनू आणि इशांत मौजमजा करीत होते. मनोजला दारू पाजण्याच्या नादात इशांतला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे दोघेही मित्र झाले आणि सोबतच दारू पिऊ लागले. यादरम्यान मोनूला मुलगा झाला. मोनूसोबत इशांत नको त्या अवस्थेत दिसल्यामुळे त्यांच्यात चांगलाच वाद झाला.

मोनूने दोघांची समजूत घालून वाद मिटवला. इशांत आणि मोनूचे संबंध वाढत गेले आणि त्यांनी पती-पत्नीप्रमाणे सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही दोन वर्षांपासून बजरंगनगरात किरायाच्या खोलीत राहू लागले. मात्र मनोज हा मोनूला त्रास देत होता. 

आठ तासांत आरोपीला अटक 
पीआय शैलेश संख्ये आणि गुन्हे शाखेचे प्रदीप अतुलकर यांच्या पथकाने रात्रीपासूनच आरोपीचा शोध घेणे सुरू केले. इशांत हा मोनूसोबत परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने कपड्याची बॅग भरली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास तो रेल्वेस्थानकाकडे जात असताना त्याला अटक केली.
 

अशी झाली वादास सुरुवात
मोनू आणि तिचा प्रियकर इशांत तीन महिन्यांपूर्वी अजनीतील शेषनगरात राहायला आले. मनोजला माहिती मिळताच तो इशांतच्या घराजवळ चकरा मारत होता. इशांत घरी नसताना त्याने पत्नी मोनूशी भेटण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या कानशिलात वाजवली. इशांत घरी येताच त्यालाही सांगितले. रविवारी इशांत आणि मनोजने सोबतच दारू घेतली. राजकमल चौकांत त्यांचे कडाक्‍याचे भांडण झाले. मनोजने शिवीगाळ केल्यामुळे इशांतने त्याचा दगडाने ठेचून खून केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT