विदर्भ

जुन्या इमारतींवर बसवावेत पर्जन्यजल प्रकल्प - कदम

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पुणे, मुंबईत प्रदूषणाची वाढलेली पातळी लक्षात घेता, नव्या इमारतींप्रमाणेच जुन्या इमारतींवर "रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प बसवावेत. तसेच डिझेल गाड्यांमुळे तयार होणाऱ्या पीएम 2.5 धूलिकणांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी हे धूलिकण तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना पर्यावरण खात्याला देण्यात येतील, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली.

आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला कदम यांनी उत्तर दिले. पुणे, मुंबईतील वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या हॉर्नचे प्रदूषण, डिझेल, पेट्रोलच्या वापरामुळे होणारे प्रदूषण यामुळे हवा, पाणी, आवाज या तिन्हीमधील प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. वाढलेला सिमेंटचा वापर, कॉंक्रिटीकरण आणि वृक्षतोड याबाबत शासन काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्‍न गाडगीळ यांनी उपस्थित केला होता.

त्यावर कदम म्हणाले, 'पीएम 2.5 तपासण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. तसेच बांधकाम क्षेत्रापैकी तीस टक्के क्षेत्र कॉंक्रिटीकरणविरहित ठेवण्याचे आदेश बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येतील.'' पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे म्हणाले, 'गाड्या आल्यावर धूर ओढून घेणाऱ्या मशिन्स सिग्नलवर बसविणार आहोत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT