नागपूर - वाढत्या उन्हात वाटसरूंच्या तृष्णातृप्तीसाठी आशीष पंडित सूर्य माथ्यावर आला की, घराबाहेर पडतात. पाण्याच्या कॅन गाडीवर सोबत घेतात. त्यांच्या दिवसभराच्या सेवाभावाची टिपलेली चित्रझलक. 
विदर्भ

नागपूरचा ‘वॉटरमॅन’ पाजतोय वाटसरूंना पाणी

प्रतीक बारसागडे

नागपूर - अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत भर दुपारी शहरात फिरत असताना पाण्याविना घसा कोरडा होऊन जीव कासावीस होतो. घोटभर पाण्यासाठी प्रचंड तगमग होते. अशावेळी एखाद्याने थंडगार शुद्ध पाणी दिल्यास नक्‍कीच आनंद होईल. नागपूरचा एक ‘वॉटरमॅन’ सध्या अनेकांची तृष्णा भागवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहे. त्याची ही नि:स्वार्थ पाणीसेवा सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. 

आशीष पंडित हे या ‘वॉटरमॅन’चे नाव असून, ते अयोध्यानगर येथील रहिवासी आहेत. आशीष जवळपास महिनाभरापासून स्वत:च्या पैशाने उन्हातान्हात नागपूरकरांची तहान भागवत आहेत. त्यांची ही जनसेवा सकाळपासून सायंकाळपर्यंत अव्याहतपणे सुरू असते. दिवसभरात स्वखर्चाने ते १० ते १२ कॅन बिसलेरीचे शुद्ध पाणी विकत घेऊन रस्त्यावरील गोरगरीब रिक्षावाले, ऑटोवाले, मेट्रोचे कर्मचारी, फुटपाथवरील दुकानदारांसह शहरात पायी चालणाऱ्यांना पाजतात. बहुतेक जण त्याच्या जवळील थंडगार पाणी पिऊन तृष्णा भागवितात. काही मात्र शंकेच्या नजरेने त्यांच्याकडे पाहून पाणी पिण्यास नकार देतात. मात्र, आशीषला त्याचे काहीच वाटत नाही. जय श्रीराम बोलून ते पुढे निघतात. उल्लेखनीय म्हणजे, रस्त्यावर एखादा अपंग किंवा अंध व्यक्‍ती दिसला तर ते स्वत: दुचाकीवरून उतरून त्याला स्वत:च्या हाताने पाणी पाजतात. 

आशीष यांची आर्थिक स्थिती बेताची असून, ते एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करतात. परंतु त्यांचे हे उदरनिर्वाहाचे साधनही आता हिरावले जाणार आहे. कारण कंपनीतून त्यांना ‘अल्टिमेटम’ मिळाला असून, ३० तारखेनंतर त्यांची नोकरी जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT