Fund Sakal
नागपूर

१ कोटी ६३ लाखांचा निधी केंद्राने शेतकऱ्यांकडून घेतला परत

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत.

नीलेश डोये

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत.

नागपूर - लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer) सन्मान योजना (Sanman Yojana) आणली. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. करदाते, नोकरदार असलेल्या ६ हजारांवर वर शेतकऱ्यांनी खात्यात जमा झालेला शेतकरी सन्मान निधी केंद्र सरकारला (Central Government) परत केला आहे. ही रक्कम सुमारे एक कोटी ६३ लाखांच्या घरात आहे. .

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ दोन वर्षांपूर्वी शेतकरी सन्मान योजना सुरू केली. प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना दिले जातात. ही रक्कम सात-बारावर नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केली होती. ती राबविण्यासाठी शासकीय यंत्रणेला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे सात-बारावर ज्यांची नावे आहेत, त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे.

यात धनाढ्य शेतकरी, व्यावसायिक शेतकरी तसेच नोकरदार शेतकऱ्यांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात दोन लाख १० हजार ३३८ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे वळता करण्यात आले आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आले. निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे परत घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. जिल्ह्यात ६ हजार ३१ शेतकरी निकषात बसत नसल्याचे समोर आले.

निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांना पैसे परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पैसे परत न केल्यास थेट बँकेतून पैसे वळते करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ५,७३० शेतकऱ्यांनी एक कोटी ६३ लाख ७२ हजार रुपये परत केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. काही शेतऱ्यांना पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्यांने त्यांच्या खात्यातून थेट रक्कम कपात करून शासन जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : रस्त्यांतील खड्ड्यांमुळे लोक मरत आहेत, प्रशासनाला सोयरसुतक नाही- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT