10 and 12 student may face problems during exam due to high temperature in nagpur
10 and 12 student may face problems during exam due to high temperature in nagpur 
नागपूर

टिनाच्या छपराचे सेंटर अन् वरून सूर्याचा प्रकोप, 'एप्रिल-मे'मधील कडक उन्हात विद्यार्थी परीक्षा कशी देणार?

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यातील बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. बोर्डांकडून ज्या शाळेत विद्यार्थी शिकले, त्याच शाळेत परीक्षा घेण्यासाठी केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, शहरीभाग वगळता, ग्रामीण भागातील ९० टक्के शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. विशेष म्हणजे, काही शाळांमध्ये टिनाचे शेड असून बहुतांश शाळांमध्ये पंखे आणि विद्युत पुरवठ्याचा अभाव असल्याने एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात विद्यार्थी परीक्षा कशी देणार? हा प्रश्न निर्माण होणार आहे. 

दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होत असते. तसेच १ ते २५ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान बारावी तर २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीचे पेपर होणार आहेत. दरवर्षी विदर्भात नागपूर आणि अमरावती या दोन विभागातून दहावीच्या परीक्षेत पावणेचार लाख तर बारावीमध्ये सव्वातीन लाखावर विद्यार्थ्यांचा समावेश होत असतो. कोरोनामुळे यावर्षी ज्या शाळेत विद्यार्थी शिकले, त्याच शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. शहरी भागात सुविधा असलेल्या शाळा असल्या तरी, ग्रामीण भागातील काही शाळा टिनाच्या शेडच्या आहेत. याशिवाय बहुताशं शाळांमध्ये सिलींग फॅन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ४५ पेक्षा अधिक तापमानात विद्यार्थी कसा तीन तास पेपर सोडवेल? त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. यावर्षी कडक उन्ह असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

बोर्डाने द्याव्या सुविधा 
विद्यार्थ्यांना केंद्रावर सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी बोर्डाची आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांनीच पाप पाडणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रावर सोयी-सुविधा द्याव्यात असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अनिल गोतमारे व शिक्षक भारतीचे प्रा. सपन नेहरोत्रा यांनी व्यक्त केले. 

वर्ग एकूण शाळा परीक्षा केंद्र उपकेंद्र १४ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा 
बारावी १५२३ ४७४ ९३८ ९४
दहावी २७१८ ६९१ १७९३ २२४ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT