10 gates are opened of totaladoh dam in nagpur  
नागपूर

पेंच आणि कन्हान नदी काठावरील नागरिकांनो सावधान! तोतलाडोह धरणाचे १० दरवाजे उघडले.. पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू

वसंत ढामरे

रामटेक (जि. नागपूर) :  तालुक्यातील आंतरराज्यीय धरण तोतलाडोहचे १० दरवाजे उघडण्यात आले असून ४१७ क्युमेंकने पेंच नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पेंच धरणाचे देखील ८ दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे पेंच आणि कन्हान नदी काठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तालुक्यात तोतलाडोह येथे महाराष्र्ट व मध्यप्रदेश सिमेवर पेंच नदीवर मोठे धरण बांधण्यात आले आहे. १४ ऑॅगष्टला तोतलाडोह धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र मध्यप्रदेशात चांगला पाऊस होत असल्याने मध्यप्रदेशातील याच नदीवरील चौराई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तोतलाडोह धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आहे. १६ऑॅगष्ट रोजी जलसाठा ९५.६३ टक्के झाल्याने धरणाचे पुन्हा ८ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. 

त्यामुळे पेंच नदीत ३१६.८४ क्युमेकने तसेच येथील विजनिर्मिती केंद्रातूनही १०१ क्युमेक असा एकूण ४१७ .७४ क्युमेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, उपविभागीय अभियंता राजेश धोटे, शाखा अभियंता अक्षय वाकडेकर यांनी पेंच व कन्हान नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

प्रशासनातर्फे इशारा

तालुक्यातील आंतरराज्यीय धरण तोतलाडोहचे १० दरवाजे उघडण्यात आले असून ४१७ क्युमेंकने पेंच नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पेंच धरणाचेदेखील ८ दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे पेंच आणि कन्हान नदी काठावरील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT