नागपूर

नागपुरात आढळले म्युकरमायकोसिसचे १०४५ रुग्ण, आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनानंतर (Coronavirus) बुरशीच्या अर्थात म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मृत्यूचा टक्का देखील वाढते आहे. ही दुसरी महामारी घोषित झाली आहे. नागपूर जिल्ह्यात (Nagpur district) शनिवारी ४३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ही धोक्याची घंटा असून एकाच दिवशी ४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे महिनाभरात नागपूर जिल्ह्यात १ हजार ४५ रुग्ण आढळले असून यातील ८१ जणांचा बळी बुरशीने घेतला आहे. (1045 patients of mucormycosis in Nagpur district)

नागपूर जिल्ह्यात शनिवारी मेयो, मेडिकलसह शासकीय रुग्णालयात १८ तर खासगी रुग्णालयात २५ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले. तसेच सरकारी रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ३ असे एकूण ४ मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर बुरशीच्या आजाराचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्यात सद्या शासकीय रुग्णालयात २६३ तर खासगी रुग्णालयात ७८२ म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नोंदीत आहे.

पूर्व विदर्भात बुरशीचे ८६ मृत्यू

नागपुरातील ८१ मृत्यूसहित पूर्व विदर्भात म्युकरमायकोसिसचे ८६ मृत्यू झाले आहेत. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा अशा सहा जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे १ हजार २३५ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ८१ मृत्यू एकट्या नागपुरातील आहेत. तर उर्वरित मृतांमध्ये चंद्रपूरात १, गोंदियामध्ये ३ तर वर्धा येथे १ असे पाच मृत्यू झाले आहेत. नागपूरातील स्थिती सद्या भयावह आहे.

मनपाच्या पाच सेंटरवर होणार म्युकरमायकोसिसची चाचणी

शहरात महापालिकेचे पाच पोस्ट कोविड केअर सेंटर ३१ मे पासून सुरू केले जाणार आहेत. केटीनगर रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह, सदर रोगनिदान केंद्र आणि पक्वासा आयुर्वेदिक रुग्णालय या पाच सेंटरवर म्युकरमायकोसिसची चाचणी केली जाणार आहे. यासंबंधात आज रुग्णांची चाचणी कशा पद्धतीने करता येईल, याबाबत डॉक्टर, नर्स व मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी प्रशिक्षण दिले.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी पोस्ट कोविड केअर सेंटर उघडण्याबाबत प्रशासनाला सूचना केली होती. त्यामुळे प्रशासनाने वेगाने प्रक्रिया करीत पाचही रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी पूर्ण केली. येथे म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) चाचणीची मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.

सेंटरवर महापालिकेने १० डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मनपाच्या कोरोना वॉर रूममध्ये झालेल्या प्रशिक्षणादरम्यान टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रामकृष्ण शिनाय, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ. वर्षा देवस्थळे व डॉ. शुभम मनगटे उपस्थित होते.

आठवड्यातून चार दिवस चाचणी

पोस्ट कोविड केअर सेंटरमध्ये सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या चार दिवशी रुग्णांची चाचणी केली जाईल. बुधवार आणि शनिवारी तज्ज्ञ डॉक्टर संशयित रुग्णांना मार्गदर्शन करतील. मनपाच्या या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले.

(1045 patients of mucormycosis in Nagpur district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT