railway
railway e sakal
नागपूर

मध्य रेल्वेचे ११ कोच कोविड रुग्णांसाठी सज्ज, मनपासोबत संयुक्तपणे करणार उपचार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वे कडून अजनीच्या कंटेनर ‍डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका आणि मध्य रेल्वे मिळून येथे १७६ बेड्‌सवर कोविड रुग्णांचा उपचार करणार आहे.

बुधवारी (ता. २८ एप्रिल) महापौर दयाशंकर तिवारी, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलचे मंडल रेल प्रबंधक रिचा खरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक जय सिंग, मध्य रेल्वेचे अधिकारी सी.एम.एस. चंपक बिसवास, वरिष्ठ डी.एम.ई. अखिलेश चौबे, ए.सी.एम.एस वैशाली लोंढेकर, वरिष्ठ डी.ई.एन रोहित ठवरे, डी.सी.एम. विपुल सुसकर, मनपा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी कोचेस मध्ये व्यवस्थेची पाहणी केली. महापौरांनी यावेळी मध्य रेल्वेला कोविड रुग्णांसाठी त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्याची सूचना केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन, औषधी व जेवणाची ची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी सर्व व्यवस्था लवकरात-लवकर पूर्ण करुन रेल्वेच्या कोचेसचा रुग्णांसाठी वापर करण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली.

मध्य रेल्वेकडून ११ कोचेस रुग्णांसाठी व १ कोच डॉक्टर व स्टाफसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेतर्फे प्रत्येक कोचला नऊ कुलर व सर्व कोचसाठी २२ ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. रेल्वे कडून कोचेस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT