13 year old boy is no more due to drowning in pit  
नागपूर

"मला पोहता येतं" अशी थाप मारून उतरला खोल खड्ड्यात; काही वेळातच तरंगताना दिसला मृतदेह 

अनिल कांबळे

नागपूर ः पोहता येत नसताना देखिल पोहण्याचा मोह एका मुलाच्या जीवावर बेतला. वाघधरा ईसासनी परिसरात असलेल्या पाण्याच्या खड्‍ड्यात तेरा वर्षीय मुलगा बुडून मृत्यू पावला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निखिल श्रीकिशन सिंग (रा. विश्‍वविनायकनगर, वाघदरा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल सिंग हा शनिवारी दुपारी काही मित्रांसह घराजवळ असलेल्या वाघधरातील पाण्याच्या खड्ड्यात पोहायला गेला होता. खड्ड्यातील पाण्याचा अंदाज त्या मुलांना आला नाही. त्यांनी पोहण्यासाठी अंगातील कपडे काढले आणि काठावर ठेवले. निखिल मोठा असल्यामुळे त्याने पोहत येत असल्याची थाप मित्रांना मारली. 

त्याने पाण्यात उडी मारली आणि गटांगळ्या खायला लागला. काही वेळातच तो पाण्यात बुडाला. त्याचे मित्र घाबरले आणि मदतीसाठी आरडाओरड करायला लागले. परीसरात कुणीही नसल्यामुळे मदतीला कुणीही आले नाही. ते मित्र घाबरले. त्यांनी थेट घराकडे पळ काढला. 

सायंकाळी निखिल घरी न आल्यामुळे त्याच्या आईवडीलांनी त्याचा शोध घेतला तसेच मित्रांना विचारपूस केली. त्यापैकी एकाने नाल्यात पोहायला गेल्याचे सांगितले आणि तो पाण्यात बुडाल्याची माहिती दिली. 

रात्री साडेनऊ वाजता त्याचे वडील काही नागरिकांना घेऊन वाघदऱ्यातील खड्ड्याकडे गेले. त्यांना निखिलचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांना एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking : विमान कोसळले! दिग्गज खेळाडूसह कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू, पाच वर्षांचा मुलगा अन् १४ वर्षांची मुलगी आगीच्या तांडवात सापडले

...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजी महाविकास आघाडीत भूकंप! आमदार राहुल आवाडेंनी सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याला लावलं गळाला

Chinese GPS Tracker : कदंबा नौदल तळाजवळ आढळला चिनी GPS लावलेला समुद्री पक्षी; संशोधन की गुप्तहेरगिरी? संशय बळावला

Ind VS Sa 5th t20: विजयी शिक्क्यासाठी आजची लढत; आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात टाकण्याची भारताची संधी

SCROLL FOR NEXT