13-year-old girl six months pregnant case under POCSO Act registered against accused Sakal
नागपूर

Nagpur News : १३ वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

जुन्या कामठीत राहणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या १३ वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आजीला सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

कामठी : मुलीवर कुणीतरी नातेवाईक मुलानेच बलात्कार केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच मुलगी नाव सांगण्यास तयार नाही, तर मुलीची आईसुद्धरा तक्रार देण्यास तयार नव्हती. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

जुन्या कामठीत राहणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या १३ वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आजीला सांगितले. तिच्या आजीने तिला ३१ मे रोजी एका महिला डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे प्राथमिक निदान केले. मात्र, तिच्या आजीचा विश्वास बसला नाही. तिने डॉक्टरांसमोर मुलीला विचारणा केली.

कुणीही प्रियकर नाही आणि प्रेमसंबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिली. त्यामुळे ती आजीसोबत घरी आली. आजीचा नातीवर विश्वास असल्याने तिने घरात कुणालाही सांगितले नाही. ३ जूनला मुलीने पोट दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने जरीपटक्यातील एका डॉक्टरकडे मुलीला आणले.

डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर अहवालात मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. अहवालानंतर तिच्या आईने तिची कानउघडणी केली. डॉक्टरांनी मुलीचे वय लक्षात घेता पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला.

पालकांचा तक्रार देण्यास नकार

१३ वर्षाची मुलगी गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, मुलीच्या आईने पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. मात्र, अल्पवयी मुलीवर कुणीतरी अज्ञात आरोपीने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनीच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नातेवाईक युवकावर संशय

पीडित मुलगी प्रियकराचे नाव सांगण्यास तयार नाही. त्यामुळे पोलिस अडचणीत आले. मात्र, पोलिसांनी काही संशयितांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीवर कुणीतरी नातेवाईक मुलानेच बलात्कार केल्याचा संशय वर्तीविण्यात येत आहे. त्यामुळेच मुलगी नाव सांगण्यास तयार नाही तर मुलीची आईसुद्धा तक्रार देण्यास तयार नव्हती. हे प्रकरण जुन्या कामठी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT